Sanjay Raut: ‘हल्ल्याचे समर्थन नाही, पण आदर दोन्हीकडून व्हावा’ – shivsena mp sanjay raut says attack is not supported, but respect should come from both


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘आम्ही कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचे समर्थन करत नाही. निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला याचे आम्हाला दु:ख आहे. पण, आदर हा दोन्हीकडून व्हावा. राज्याच्या प्रमुखांविषयी बोलताना आदरच ठेवला पाहिजे, असे सांगतानाच हल्ला करणाऱ्यांनी आम्हाला विचारून हल्ला केला नाही,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. मुख्यमंत्रिपद हे संविधानिक पद आहे. याची जाणीव सर्वांनाच असायला हवी. त्यामुळे या पदाचा आदर ठेला पाहिजे. आदर हा दोन्हीकडून असायला हवा. तुम्हीही काहीही करणार आणि लोक गप्प बसणार,असे कधी होत नाही. संविधानिक पदावरील व्यक्तीबद्दल बोलल्यास लोकांना राग येणारच. त्यात सरकारचा दोष काय,असा सवाल करतानाच एवढा मोठा महाराष्ट्र आहे. १२ कोटी लोक राहतात. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांनी आम्हाला विचारून हल्ला केला नाही. हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकते. माझ्याही बाबतीत होऊ शकते, असे संजय राऊत म्हणाले.प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. आम्ही कोणत्याही मारहाणीचे समर्थन करत नाही. पण तुम्ही वातावरण बिघडवू नका, असे सांगतानाच त्यांच्या मागे कोण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे, असे राऊत म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *