Sangli police: Sangli Police: ‘हा’ जिल्हा करोनाच्या विळख्यात; आणखी एक पोलीस दगावला – police died of coronavirus in sangli


सांगली:सांगली जिल्हा पोलीस दला अंतर्गत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या ४८ वर्षीय पोलीस हवालदाराचा करोना संसर्गामुळे रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. मिरज येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजपर्यंत सांगली पोलीस दलातील २२८ जणांना करोनाचा संसर्ग झाला, तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पोलिसांची चिंता वाढली आहेत. (Coronavirus In Sangli Latest News )

वाचा: डॉक्टरांना धक्काबुक्की करून करोना बाधित पळाला; कृष्णेच्या पात्रात केली आत्महत्या

सांगली जिल्ह्यात वाढत असलेल्या करोना संसर्गाचा फटका करोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही बसत आहे. पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा यापूर्वी करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनादेखील करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचा करोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

वाचा: आज्जी काळजी करू नका; तीन दिवसात बऱ्या व्हाल; पीपीई किट घालून पाटील रुग्णालयात

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील हवालदार ११ ऑगस्टपासून रजेवर होते. मधुमेहाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. यातच त्यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मिरजेतील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

वाचा: सांगलीत करोनाबाधित मृतदेहावर परस्पर केले अंत्यसंस्कार

दरम्यान, ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने जिल्हा पोलीस दलातील करोनाबळींची संख्या तीनवर पोहोचली आहे. सांगलीत पोलीस दलातील २२८ कर्मचारी करोना बाधित झाले असून, तिघांचा मृत्यू झाला तर ९८ पोलिसांनी करोनावर मात केली आहे.

वाचा: नुसत्या नोटाच छापू नका!; मुश्रीफांचा खासगी डॉक्टरांना ‘हा’ सल्लाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *