sachin tendulkar: ५६० मुलांसाठी सचिन तेंडुलकर झाला देवदूत; अशी करत आहे मदत – master blaster sachin tendulkar lends support to 560 children from economically weaker background


मुंबई: Sachin Tendulkar supports 560 children भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विक्रमवीर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने करोना काळात केंद्र आणि राज्य सरकारासह अनेकांना मदत केली आहे. त्याच बरोबर सरकारच्या जनजागृती अभियानात तो आघाडीवर होता. आता सचिनने मन जिंकून घेणारे आणखी एक काम केले आहे.

वाचा- मुंबई इंडियन्सकडे आहे हा घातक गोलंदज; विकेटचे दोन तुकडे केले, व्हायरल video

सचिनने आर्थिकदृष्ट्या कमकूवत असलेल्या ५६० आदिवासी मुलांना मदत करण्यासाठी एका NGOसोबत काम करण्याचे ठरवले आहे. सचिनने एजीओ परिवार (NGO Parivaar) नावाच्या एका संस्थेसोबत मध्य प्रदेशमधील सिहोर जिल्ह्यातील दुर्गम गावात सेवा कुटीरची निर्मिती केली आहे.

वाचा- भारतीय गोलंदाजावरील बंदी संपली; ३७ व्या वर्षी करणार मैदानात पदार्पण

मध्य प्रदेशमधील सेवानिया, बिलपती, खापा, नयापूर आणि जामुनझील गावातील मुलांना सचिनच्या मदतीने संबंधित संस्था पौष्टिक भोजन आणि उत्तम शिक्षण उपलब्ध करून देत आहे. ही सर्व मुले प्रामुख्याने बरेला भील आणि गोंड समाजातील आहेत.

वाचा- धोनी-वॉट्सनची जोडी जमली; पाहा चौकार आणि षटकारांचा पाऊस Video

मध्य प्रदेशमधील अशा आदिवासी मुलांना सचिनने मदत केली आहे ज्यांच्यामध्ये कुपोषण प्रमाण अधिक आहे. त्याच बरोबर त्यांना शिक्षणाची सोय मिळत नाही, असे एनजीओने म्हटले आहे. सचिन युनिसेफचा दूत आहे आणि सातत्याने मुलांच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलत असतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *