reduce salaries of mps: खासदारांच्या पगारात होणार ३० टक्के कपात, लोकसभेत विधेयक सादर – coronavirus india bill introduces in loksabha reduce salaries of mps


नवी दिल्लीः खासदारांच्या पगाराबाबत केंद्रातील मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खासदारांच्या पगारामध्ये एका वर्षासाठी ३० टक्के कपात करण्याची तरतूद असलेलं विधेयकात सरकारने लोकसभेत सादर केलं. करोना व्हायरसच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत संसद सदस्यांचे वेतन, भत्ता आणि निवृत्तीवेतन दुरुस्ती विधेयक २०२० सादर केलं. संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ता आणि निवृत्तीवेतन अध्यादेश २०२० याच्या जागी हे विधेयक मांडलं गेलंय. संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन कायदा १९५४ मध्ये दुरुस्ती करण्याचे विधेयक सरकार मांडत आहे. यासंदर्भातील अध्यादेशाला ६ एप्रिलला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. ७ एप्रिलपासून तो लागू झाला होता, असं प्रल्हाद जोशी म्हणाले.

करोना व्हायरसच्या रोगामुळे तातडीने मदत आणि सहकार्याचं महत्त्व निदर्शनास आलं आहे आणि म्हणूनच साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी काही आपत्कालीन उपाय आवश्यक आहेत, असं अध्यादेशात म्हटलं आहे.

आग्र्यातील संग्रहालयाला मुघलांचे नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, यूपीच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

दिल्ली दंगल प्रकरणी उमर खालिदला १० दिवसांची पोलीस कोठडी

हा पैसा CIF मध्ये वळवला जाईल

हा पैसा कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये (CIF) जमा होईल. सरकारच्या आयकर, केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमा शुल्कद्वारे येणारे सर्व महसूल आणि इतर निधी हा या फंडात जमा होतो. सरकारकडून करण्यात येणारा खर्चही सीएफआयमधून केला जातो. संसदेच्या मंजुरीशिवाय यातून पैसे काढता येणार नाहीत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *