Petrol and Diesel Price Today – पेट्रोल -डिझेल आणखी स्वस्त ; जाणून घ्या आजचा इंधन दर


मुंबई : जवळपास महिनाभरापासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्याने त्याचा फायदा ग्राहकांना देण्याची तयारी पेट्रोलियम कंपन्यांनी दर्शवली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मागील तीन दिवसांत दुसऱ्यांदा इंधन दरात कपात केली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले आहे.

मुंबईत सोमवारी पेट्रोल दर प्रती लीटर ८८.२८ रुपये आहे. तर डिझेल ७९.२९ रुपये झाले आहे. शनिवारी केलेल्या दर कपातीने मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.५१ रुपये आणि डिझेलचा भाव ७९.४५ रुपये झाला होता. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.७२ रुपये असून डिझेलचा भाव ७२.७८ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.७७ रुपये असून डिझेल ७८.२८ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.२३ रुपये आहे. डिझेल ७६.२८ रुपये प्रती लीटर झाला आहे.जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४० डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे.

सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा भाव
देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी सहा वाजता कंपन्यांकडून इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते.

आनंदाची बातमी; ही कंपनी देणार ३० हजार लोकांना नोकऱ्या, जाणून घ्या काय काम आहे
अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेची घडी आता पूर्वपदावर येत आहे. इंधन मागणी देखील वाढत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला चाट बसली होती. या दरवाढीने दिल्लीत डिझेलचा भाव पेट्रोलच्या पुढे गेला. डिझेल सार्वकालीन उच्चांकावर गेलं होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थानिक कराच्या बोजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढले आहेत. यावर विविध माध्यमातून टीका झाली. त्यानंतर ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *