Nagpur Firing: रात्रीची वेळ, सर्वत्र सामसूम अन् अचानक झाला गोळीबार, आवाजाने नागपूर हादरले​ – nagpur firing at midnight in jaripatka youth injured


नागपूर: क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा युवकांनी केलेल्या गोळीबारात युवक जखमी झाला. ही थरारक घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जरीपटक्यातील हुडको कॉलनी येथे घडली. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. प्रितेश पाटील (वय २५), असे जखमीचे नाव आहे.

प्रितेशचा भाऊ पलाश राजू पाटील (वय २७) याने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी पुनेश ठाकरे , मनोज कहाळकर व त्याच्या आठ साथीदारांविरुद्ध बेकायदा जमाव जमवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.रविवारी रात्री पलाश हा कारने घरी जात होता. वैशालीनगर शाळेसमोर आठ ते दहा युवक रस्त्यावर गाडी पार्क करून बोलत होते. पलाश याने त्यांना गाडी बाजूला करायला सांगितले. त्यांनी पलाश याला शिवीगाळ केली. पलाशने नमते घेतले. तो घरी गेला. त्यानंतर काही वेळातच पुनेश, मनोज व त्याचे साथीदार हातात तलवार व शस्त्रे घेऊन पलाश याच्या घरी गेले. त्यांनी पलाश याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. पलाश याचा भाऊ प्रितेश हा बाहेर निघाला. यावेळी हल्लेखोरांच्या एका साथीदाराने प्रितेश याच्या दिशेने गोळीबोर केला. गोळी प्रितेश याच्या पोटाला चाटून भिंतीवर आदळली. प्रितेश जखमी झाला. कार व मोपेडची तोडफोड करून हल्लेखोर पसार झाले.

दरम्यान, गोळीबाराच्या आवाजाने नागरिक जमले. एका नागरिकाने जरीपटका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच जरीपटका पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पलाशच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आणखी बातम्या वाचा:

हृदयद्रावक! ३ वर्षीय चिमुरडीला निर्दयी बापानं जमिनीवर आपटलं; जागीच मृत्यू

धक्कादायक! कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार

नागपूरमध्ये व्हाइटनरसाठी खून; बालगुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

सुशांत-रिया ड्रग्ज कनेक्शन; सातही दलालांना एनसीबीकडून अटकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *