Mumbai crime: मुंबई हादरली; ५ वर्षीय मुलीला १० रुपयांचे आमिष, शेजाऱ्याने केला बलात्कार – mumbai crime news man sexually assaults five year old girl in dharavi arrested


मुंबई: मुंबईच्या भाईंदरमध्ये कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उजेडात आली असतानाच, धारावीत एका ५ वर्षांच्या मुलीवर ५९ वर्षीय नराधमानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या मुलीला १० रुपयांचे आमिष दाखवले आणि धमकावून गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

पीडित मुलीने या घटनेची माहिती आपल्या आईला दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. शुक्रवारी दुपारी शेजाऱ्याने मुलीला बोलावून घेतले. तिला १० रुपये दिले आणि गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले, असे तिच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या हातात दहा रुपये बघितल्यानंतर आईने तिला याबाबत विचारणा केली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने धारावी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. धारावी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आणखी बातम्या वाचा:

धक्कादायक! कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार

पुणे: भररस्त्यात कोयत्याने केक कापणे आलं अंगलट

संतापजनक! व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणानं कुत्र्याला तलावात फेकलं

रात्रीची वेळ, सर्वत्र सामसूम अन् अचानक सुरू झाला गोळीबार, नागपूर हादरले

हृदयद्रावक! ३ वर्षीय चिमुरडीला निर्दयी बापानं जमिनीवर आपटलं; जागीच मृत्यू

पिंपरी: एटीएम गॅस कटरने कापला, अवघ्या १० मिनिटांत साडेनऊ लाख पळवलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *