Malabar gold decide one nation one price: एक देश एक किंमत; हा समूह सोन्याचा एकच भाव ठरवणार – malabar gold decide one nation one price for gold


मुंबई : वस्तू आणि सेवा करांबरोबरच सोन्यावर स्थानिक पातळीवर कर लावले जातात. त्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये राज्यांनुसार चढ-उतार दिसून येतात. मात्र राष्ट्रीय स्तरावर आता सोन्याचा एकच दर प्रणाली राबवण्याचा निर्णय मलाबार समूहाने घेतला आहे. मलाबारच्या देशभरातील सर्वच दालनांमध्ये ग्राहकांना आता एकाच सामायिक भावात सोने (One Nation One Price for Gold) खरेदी करता येणार आहे.

मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, कोविड-१९ टाळेबंदीतून देशाचा बहुतांश भाग टप्प्याटप्प्याने बाहेर पडत आहे आणि व्यवसायाचे चक्रही हळूहळू रूळावर येत आहे. अशा समयी सुवर्ण आभूषण विक्री व्यापाराने प्रधान महत्त्व द्यावयाचे तीन पैलू म्हणजे – ग्राहकांचे हित, पारदर्शी व्यापार पद्धती आणि चिरंतन आणि सर्वसमावेशक प्रगती हे होय. देशस्तरावर सोन्याची किंमत एकसारखी राखली जाऊन या तिन्ही पैलूंची काळजी घेतली जाईल आणि व्यवसायातील प्रभावी परिवर्तनालाही ती गोष्ट फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा भाव
महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कोलकाता, अहमदाबाद वगैरे महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये त्यांच्या सराफांच्या संघटनांकडून ठरविल्या गेलेल्या सोन्याच्या किमती लागू होत असतात. दीर्घ काळापासून चालत आलेली ही प्रथा आहे. सोन्याचे दर अथवा सराफ व्यावसायिकांच्या भाषेत बोर्ड रेट हे वाहतुकीचा खर्च, स्थानिक कर, सराफा संघटना अशा निरनिराळ्या घटकांच्या प्रभावामुळे या बाजारपेठांमध्ये वेगवेगळे असतात. मात्र सध्या देशाने जीएसटीच्या रूपात एक-सामाईक कर प्रणालीचा अवलंब सुरू केला आहे आणि तिच्या अनुपालनात उत्तरोत्तर वाढ होत आहे. शिवाय सुवर्ण आभूषणांतील सोन्याच्या दर्जाचे प्रमाणीकरण करणाऱ्या हॉलमार्किंगची अंमलबजावणीही लवकरच होऊ घातली आहे. त्यामुळे सर्वच बाजारपेठांमध्ये सोन्याची एकच किंमत लागू करण्याच्या कल्पनेला अधिकच महत्त्व आहे.

विम्याची ई-पॉलिसी; करोना संसर्ग वाढल्यामुळे ‘इरडा’चा निर्णय
अहमद पुढे म्हणाले, एक देश, एकसारखी सोन्याची किंमत यावर सराफ उद्योगात सहमतीचे वातावरण तयार करण्यात सरकारनेच सक्रियपणे भूमिका बजावणे आवश्यक आहे. वास्तविक, सामाईक सोन्याच्या किंमतीचे अनुसरण आणि सर्वत्र काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाल्यास, सोन्याच्या तस्करीला आपोआप पायबंद घातला जाईल. या कुप्रवृत्तीने सराफ उद्योगाच्या विशेषत: संघटित सुवर्ण आभूषण विक्रेता दालनांची साखळी असणाऱ्या समूहांच्या नफाक्षमतेला कात्री लावली आहे. सोने व्यापारी आणि सराफ महासंघांशी सरकारने चर्चेला सुरुवात, एकसारखी किंमत राबविण्याच्या धोरणासाठी आवश्यक वातावरण तयार करायला हवे, असे त्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *