Kangana Ranaut For BJP Bihar Campaign Devendra Fadnavis Clears Party Stand – बिहारमध्ये कंगना भाजपची स्टार प्रचारक?; फडणवीस यांनी दिले ‘हे’ उत्तर


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावत हिने अनेक गंभीर दावे केले आहेत. त्यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात टोकाचा संघर्षही पाहायला मिळाला असून या सर्वात भाजपकडून राजकारण केलं जात आहे. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जाणीवपूर्वक वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शिवसेनेकडून केला जात असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळला आहे. ( Devendra Fadnavis clarified about Kangana Ranaut )

वाचा: ‘बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान सुरू झाले’

बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजप कंगना राणावतला पाठिंबा देत आहे व बिहारमध्ये कंगना भाजपसाठी स्टार प्रचारक म्हणून प्रचारात उतरणार असल्याच्या बातम्यांत कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवरील आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी बिहार निवडणुकीत भाजपसाठी एकमेव स्टार प्रचारक असतील आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील असे ठामपणे सांगतानाच शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला.

वाचा: ‘त्या’ सर्वांची तोंडे काळी करून कंगना गेली; प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला

‘बिहार निवडणुकीत प्रचारासाठी आम्हाला दुसऱ्या कोणत्याही स्टार व्यक्तीला बोलावण्याची आवश्यकता नाही. देशाचे सुपरस्टार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपसाठी सर्वात मोठे स्टार आहेत. बिहारमध्ये प्रचारासाठी ते एकटेच पुरेसे आहेत. त्यांच्यावर जनतेचा जो विश्वास आहे त्याच्या जोरावरच आम्ही देशात विजय मिळवला आहे आणि सर्वत्र विजयांची मालिका सुरू आहे’, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

वाचा: कंगना हिमाचलला परत गेली! काँग्रेसनं उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात राजकारण केलं जात आहे आणि बिहार निवडणुकीसाठीच महाराष्ट्र सरकारवर आरोप केले जात असल्याबद्दल विचारले असता तो आरोपही फडणवीस यांनी फेटाळला. सुशांत हा बॉलीवूडमधील एक तरुण आणि उमदा कलाकार होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणूनच त्याच्या मृत्यूमागील सत्य पुढे यायला हवं व त्याला न्याय मिळायला हवा, इतकीच भाजपची अपेक्षा आहे. केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू झाल्यानंतर आता लवकरच सत्य समोर येणार आहे, असे नमूद करतानाच या प्रकरणाचा बिहारच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही. आम्हाला या मुद्द्याचं अजिबात राजकारण करायचं नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वाचा: महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं?; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयात झालेल्या अतिक्रमणावर पालिकेने कारवाई केली. त्याबाबत विचारले असता फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला दोष दिला. सरकारने सूडभावनेने ही कारवाई केल्याचे स्पष्टच दिसत आहे. कारवाईची ही पद्धत नाही, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *