Happiest Minds Technologies: ‘हॅपिएस्ट माइंड्स’IPO; ‘शेअर अलॉटमेंट’बाबत अशी मिळवा माहिती – how to check happiest minds technologies IPO allotment status


मुंबई : करोना संकट आणि भांडवली बाजारातील अनिश्चितता असून देखील हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज लिमिटेड (Happiest Minds Technologies) ची समभाग विक्रीला प्रचंड यश मिळाले आहे. ७०२ कोटींच्या शेअर्ससाठी तब्बल १५१ पट म्हणजेच ५४२९४ कोटींची बोलली लागली आहे. त्यामुळे शेअर अलॉटमेंटमध्ये डिमॅट खात्यात शेअर जमा झाल्यास गुंतवणूकदारांसाठी जणू लॉटरीच लागणार आहे.

हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज शेअर वाटपाकडे (Share Allotment) किरकोळ गुंतवणूकदार आणि उच्च मालमत्ता असलेले गुंतवणूकदार (HNI’s) यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी शेअरचे वाटप होण्याची शक्यता आहे. गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी हा शेअर भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे.

नफावसुलीने ब्रेक ; सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी गमावली
याआधीच विशेष म्हणजे ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर १४२ ते १४६ रुपये जादा दराने मिळत आहेत. आयपीओसाठी प्रती शेअर १६५ ते १६६ रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता. एकूण ७०२ कोटींच्या आयपीओसाठी ५८२९४ कोटींची बोली लागली आहे. १५१ पट हा आयपीओ सबस्क्राईब झाला आहे. बऱ्याच कालावधीनंतर बाजारात चांगला आयपीओ आल्याने गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला असल्याचे शेअर विश्लेषकांचे म्हणणे आहे.

वाचा : सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा भाव
उच्च मालमत्ता असलेले गुंतवणूकदारांसाठी (HNI’s) शेअरची कमाल मर्यादा १६६ रुपये असून यात ३५१.४६ पट सबस्क्रिप्शन ७ दिवस फायदा, ७ दिवसांचे व्याज असे ७८.३२ रुपये प्रती शेअर वाढतात.ग्रे मार्केटमध्ये या शेअरचा भाव २४४ रुपये चालला आहे. त्यामुळे त्यातही HNI’s ६३.६८ रुपये ते ६७.६८ रुपये प्रती शेअर नफा कमवू शकतात.

वाचा : डीमॅट खाते उघडताय; ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
देशात डिजिटल सेवांची मागणी वाढत आहे. त्यामुळे हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिजने मागील तीन वर्षात सरासरी २१ टक्के वृद्धी नोंदवली.७०२ कोटींच्या शेअर्ससाठी तब्बल ५८२९४ कोटींचे खरेदीचे प्रस्ताव कंपनीला प्राप्त झाले आहेत. करोनाच्या आर्थिक संकटात अशा प्रकारची कामगिरी कंपनीचे संस्थापक ७७ वर्षीय अशोक सूता (ashok soota) यांनी करून दाखवली आहे.

इथं कळेल तुम्हाला शेअर वाटप झालेत की नाही
ज्या गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीसाठी बोली लावली आहे, अशा गुंतवणूकदारांना kfintech.com या ऑनलाइन पोर्टलवर माहिती मिळेल. या आयपीओसाठी KFin Technologies Private Limited ही रजिस्ट्रार आहे. गुंतवणूकदारांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेअर वाटप करणे , ज्यांना शेअर वाटप झाले नाही त्यांना परतावा देणे तसेच आयपीओशी संबंधित गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसन करण्याची जबाबदारी आयपीओसाठी नियुक्त केलेल्या रजिस्ट्रारवर आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *