Gold price Up: सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा भाव – gold silver rate gain today


मुंबई : गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात उलथापालथ झाली होती. मात्र या अस्थिरतेला सोमवारी ब्रेक लावला. आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१४८४ रुपये असून त्यात १६५ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा भाव एक किलोला ६८२५८ रुपये आहे.

कमॉडिटी बाजारात शुक्रवारी सकाळी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोन्याचा भाव ५१ हजार रुपयांच्या आसपास आहे. तर चांदी १००० रुपयांनी स्वस्त झाली असून एक किलोचा भाव ६७८६६ रुपये आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये त्याआधीच्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती.

लवकरच महागाईपासून सुटका; मुख्य आर्थिक सल्लागारांचा अंदाज
युरोपियन केंद्रीय बँकेच्या पतधोरणावर ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्हची वैठक होणार आहे. करोना संकटाची तीव्रता पाहता या बँका अर्थव्यवस्थेबाबत काय अंदाज वर्तवतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. अमेरिका-चीन मधील संघर्ष , ब्रेक्झिट, करोना संकट आणि आर्थिक नुकसान यामुळे मागील काही सत्रात जागतिक बाजारात सोने वधारले आहे. कोटक सिक्युरिटीजच्या अभ्यासानुसार येत्या काही आठवड्यात सोन्याचा भाव १९०० ते २००० डॉलर प्रती औंस राहण्याची शक्यता आहे.

सेबीचे नवे निर्देश; मल्टी कॅप म्युच्युअल फंडांची गुंतवणूक होणार पारदर्शक
जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. करोना संकटाची तीव्रता आणि आर्थिक समस्या यामुळे सोन्याला सुगीचे दिवस पुन्हा प्राप्त झाले आहेत. सोमवारी स्पॉट गोल्डचा भाव प्रती औंस १९५०.३ डॉलर झाला आहे. चांदीचा भाव २६.९० डॉलर प्रती औंस आहे.

सोने काही प्रमाणात स्वस्त झाल्याने सराफा बाजारात मागणी वाढली आहे. goodreturns या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५०९०० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०००० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४५४० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०४२० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३१२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९०७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३५३० रुपये आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *