Fly: अरे देवा! माशीला मारण्याच्या नादात घरालाच आग लागली – man chasing fly accidentally blows up part of house


पॅरिस: राजाचे नाक एका माशीमुळे कापले गेल्याची गोष्ट सर्वांनीच लहानपणी ऐकली असेल. तसाच काहीसा प्रकार फ्रान्समधील दोर्दोन प्रांतातील एका गावात घडला आहे. एका माशीला मारण्याच्या नादात अख्या घरालाच आग लागली असल्याची घटना समोर आली आहे. त्रास देणाऱ्या माशीला मारण्याचा प्रयत्न ८० वर्षांच्या आजोबाच्या जीवावर बेतला असता.

माशींचा आणि मच्छरांचा त्रास नकोसा करतात. घरी रात्रीच्या वेळी आरामात जेवण जेवत असताना अचानक एक माशी त्यांच्या अवतीभवती गुणगुणत फिरू लागली. आजोबांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, जेवताना त्यांना माशीचा त्रास होऊ लागल्याने अखेर त्यांनी माशी मारण्याचे इलेक्ट्रीक रॅकेट उचलले. आजोबा आणि माशी यांचा खेळ सुरू झाला. आजोबांना आणि त्यांच्या हातातील रॅकेटला माशी हुलकावणी देत होती. अखेर ही माशी स्वयंपाकघरात शिरली आणि तिथेच घात झाला.

वाचा: अजबच! नाकावरील मुरूम हाताने फोडले आणि मेंदूत झाला संसर्ग

वाचा: कमोडवर नैसर्गिक विधीसाठी बसला पण सापाने गुप्तांगावर चावा घेतला!

माशीच्या पाठोपाठ आजोबादेखील स्वयंपाक घरात शिरले. पण, त्याचवेळी इलेक्ट्रीक रॅकेट गॅसच्या शेगडीजवळ नेली असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागली. ही आग पसरण्यास सुरुवात झाली. घराचे छप्पर आगीत जळून गेले आहे. सुदैवाने आजोबांची प्रकृती चांगली असून ते सुखरूप आहे. गॅस गळती आणि इलेक्ट्रीक रॅकेट यांच्यामुळे आग लागली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, नेमके कारण समोर आले नाही. माशांना, मच्छरांना मारायच्या इलेक्ट्रीक रॅकेटचा वापर मात्र सावधनता बाळगून करण्याची आवश्यकता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *