coronavirus in maharashtra: Coronavirus In Maharashtra: राज्यात शुभसंकेत; करोना बाधितांचा आकडा ५ हजारांनी आला खाली – maharashtra reports 17066 new covid19 cases 15789 discharges and 257 deaths today


मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत करोना संसर्गाने २५७ जणांचा मृत्यू झाला आहे तर १७ हजार ६६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी दिवसभरात १५ हजार ७८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहचली आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Updates )

वाचा: करोनाविरुद्धचा लढा नक्की जिंकू; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘हा’ मंत्र

करोनाच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्रात आजचे आकडे काहीसे दिलासा देणारे आहेत. गेले काही दिवस राज्यात दररोज २० हजारापेक्षा अधिक नवीन रुग्णांची भर पडत होती. काल रविवारीच राज्यात २२ हजार ५४३ रुग्ण वाढले होते. आज मात्र या आकड्यात मोठी घट पाहायला मिळाली आहे. हा आकडा ५ हजाराने कमी होऊन १७ हजारपर्यंत आला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १७ हजार ६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १५ हजार ७८९ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ७०१६ टक्के इतके असल्याची नोंद आजच्या आकडेवारीत करण्यात आली आहे.

वाचा: राज यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ विनंती

राज्यातील करोना मृत्यूंचा आकडा आज काहीसा कमी झाला असला तरी चिंता कायम आहे. आज राज्यात आणखी २५७ मृत्यूंची नोंद झाली. याशिवाय आधीच्या १०६ मृतांची नोंदही आजच्या आकडेवारीत करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता २९ हजार ८९४ इतका झाला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.७७ टक्के इतका आहे. राज्यात २४ तासांत १७ हजार ६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर आतापर्यंत करोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ इतकी झाली आहे. त्यातील ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून २ लाख ९१ हजार २५६ अॅक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

वाचा: सावधान! धारावीत करोनाचा संसर्ग वाढतोय; ‘हा’ आकडा चिंता वाढवणारा

मुंबईत आकडा पुन्हा वाढतोय

मुंबई शहर आणि उपनगरात करोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३१ जणांचा मृत्यू झाला असून २२५६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्याचवेळी १४३१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. मुंबईत सध्या प्रत्यक्षात ३१ हजार ६३ रुग्णांवर उपचार सुरू असून १ लाख ३२ हजार ३४९ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा वेग सध्या ५६ दिवसांवर आहे.

वाचा: ‘हा’ जिल्हा करोनाच्या विळख्यात; आणखी एक पोलीस दगावलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *