Coronavirus Face Mask Immunity Booster Covid 19 Infection Spread – रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मास्कची मदत! तज्ज्ञांनी पहिल्यांदा सांगितले फायदे


नवी दिल्लीः करोना व्हायरसचा ( coronavirus ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो. आता आरोग्य तज्ज्ञांनी मास्क घालण्याचा एक नवीन आणि मोठा फायदा सांगितला आहे. मास्कमुळे करोना व्हायरसाच्या संसर्गाचा वेग कमी होतोच. शिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते, असा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे.

मास्क घालून प्रतिकारशक्ती वाढवण्याचा दावा करणारा हा अहवाल ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिकल’ मध्ये प्रकाशित झाला आहे. मास्कमुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी ‘व्हेरिओलेशन’ सारखे कार्य करू शकतो. तसेच संसर्गाचा वेगही कमी करू शकतो, असं कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या जॉर्ज डब्ल्यू रदरफोर्ड आणि मोनिका गांधी यांनी म्हटलं आहे.

रोग प्रतिकारशक्ती कशी बळकट होईल?

चेहऱ्यावरील मास्क बाहेरून येणाऱ्या संसर्गजन्य घटकांना फिल्टर करु शकतो. शिंका येणं किंवा खोकल्यामुळे मास्कमधून फारच कमी प्रमाणात व्हायरस बाहेर पडतात. आजाराची तीव्रता ही शरीरात प्रवेश करणाऱ्या संसर्गजन्य विषाणूच्या भागावर अवलंबून असते, अशी थेअरी संसर्गजन्य आजारांमधील सुरवातीच्या संशोधन मांडली गेली होती. आता करोनाच्या व्हायरसच्या बाबतीतही वैद्यकीय तज्ज्ञ हा विचार करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये किती प्रवासी मजुरांचा जीव गेला? सरकारला माहीत नाही

करोना संसर्गाव्यतिरिक्त, नैराश्य आणि आत्महत्यांमध्ये वाढ; पाहा कारणे!

मास्कमुळे संसर्गाचा प्रभाव कमी होतो

मास्कसंदर्भात झालेल्या अभ्यासाचे आतापर्यंतचे सकारात्मक निकाल समोर आले आहेत. शास्त्रज्ञांनी अर्जेंटिनामधील क्रूझ जहाजाचंही उदाहरण दिले. समुद्र पर्यटनावरील प्रवाशांना सर्जिकल आणि N95 मास्क देण्यात आले. यातील २० टक्के रुग्ण हे लक्षणं नसलेली आढळून आली. तर सामान्य मास्क दिल्यावर ८१ जण लक्षणं नसलेले आढळले. यामुळे एक चांगला मास्क संसर्गाचा वेग रोखू शकतो, असं या अभ्यासातून समोर आल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *