chandrakant patil: Chandrakant Patil: CM उद्धव ठाकरेंना त्यांची भाटगिरी करणारे नेते हवेत: पाटील – chandrakant patil targets cm uddhav thackeray over maratha reservation and sushant singh rajput death case


कोल्हापूर: महाराष्ट्रातील महाभकास आघाडीतील तीन पक्षांत काडीमात्र सुसूत्रता नाही, त्यामुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात टिकला नाही, तरीही सरकार या समाजाला उल्लू बनवत आहे, असा थेट आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले.

वाचा: बिहारमध्ये कंगना भाजपची स्टार प्रचारक?; फडणवीस यांनी दिले ‘हे’ उत्तर

पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात इच्छाशक्तीच नाही. काँग्रेसला या प्रश्नात जराही रस नाही. अध्यादेश काढून मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अध्यादेश हे या प्रश्नाचे उत्तर नाही असे सांगून ते म्हणाले, अध्यादेश काढल्यास याचिकाकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. अशाने हक्क गमावून बसाल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

वाचा: मराठा आरक्षणाचा पुढचा निर्णय फडणवीस मुंबईत आल्यावरच: चव्हाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना राज्यात त्यांची भाटगिरी करणारे नेते हवे आहेत, असा टोला मारताना आमदार पाटील म्हणाले, त्यांची चूक दाखवली की आम्ही राज्याची बदनामी करतो असा ते आरोप करतात. राज्याची आणि पोलिसांची बदनामी आम्ही नव्हे तुम्हीच जास्त करत आहात असे सांगून अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ४५ दिवस एफआयआर का दाखल झाला नाही, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावर दिल्लीत आवाज उठवण्यासाठी सर्व मराठा खासदारांनी एकत्र यावे हे असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. सर्व खासदारांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याबाबत त्यांनी सर्व खासदारांना पत्र पाठवले आहे.

वाचा: ‘मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल बोलणार’

कोल्हापुरात होणार गोलमेज परिषद

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज पत्रकारांना याबाबत माहिती दिली. १ ऑक्टोबर पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास राज्यातील आमदार व खासदार यांच्या पुतळ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्याचा इशाराही यावेळी सुरेश पाटील यांनी दिला. गेली २५ वर्षे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मागणीसाठी अनेक मोर्चे निघाले. ५० पेक्षा अधिक मराठा बांधवांनी यासाठी बलिदान दिले. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्याला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकार आपली भूमिका मांडण्यात कमी पडल्यामुळेच आज ही वेळ आली आहे. यामुळे असंतोष वाढत आहे. आता मराठा समाजासमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

वाचा: कंगनाचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला?; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवालSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *