US election 2020: अमेरिकेची निवडणूक तीन देशांच्या हॅकर्सच्या निशाण्यावर! – us election russian chinese and iranian hackers all targeting 2020 election said microsoft


वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीवर हॅकिंगचे सावट आहे. ही निवडणूक चीन, रशिया आणि इराणच्या हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. या निवडणुकीशी संबंधित असणाऱ्या लोकांशी आणि विविध गटांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

याआधीदेखील २०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत रशियन हॅकर्सने हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. २०१६ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्षाच्या निवडणूक प्रचाराला प्रभावित करण्यात रशियन हॅकर्सचा सहभाग होता. आता हे हॅकर्स पुन्हा सक्रीय झाले असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडन यांचा निवडणूक प्रचार हॅकर्सच्या निशाण्यावर आहे.

वाचा: करोना: पाकिस्तानकडून जगाने शिकावं; WHOचा सल्ला!

वाचा: अमेरिका म्हणतेय, भारतापेक्षा पाकिस्तान अधिक सुरक्षित!

मायक्रोसॉफ्टने म्हटले की, स्ट्रॉन्टियम गटाशी संबंधित रशियन हॅकर्सने रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षाशी निगडीत असलेल्या २०० हून अधिक संघटनांना लक्ष्य केले आहे. स्ट्रॉन्टियम गट हा फॅन्सी बीअर नावानेही ओळखला जातो. ही टीम सायबर हल्ला करणारी म्हणून ओळखली जाते. रशियन सैन्याची गुप्तचर संस्था जीआरयूशी निगडीत असल्याची चर्चा आहे. मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष टॉम बर्ट यांनी सांगितले की, २०१६ प्रमाणेच अकाउंट हॅक करण्याची मोहीम सुरू झाली असल्याची बाब आमच्या लक्षात आली आहे.

वाचा: ट्रम्प यांना सट्टेबाजांची पसंती; तर, सर्वेक्षणात बायडन आघाडीवर

वाचा: अणवस्त्र, काकाची हत्या…ट्रम्प यांनी किम जोंगबद्दल सांगितल्या ‘या’ गोष्टी!

चिनी हॅकर्सने जो बायडन यांच्या प्रचाराशी निगडीत असलेल्या लोकांचे काही खासगी ई-मेल अकाउंट आणि ट्रम्प प्रशासनाशी निगडीत असलेल्या एका माजी प्रमुख अधिकाऱ्याच्या ई-मेल अकाउंटला लक्ष्य करण्यात आले आहे. हॅकिंगचा कोणताही परिणाम निवडणुकीवर होणार नसल्याचे होमलँड सुरक्षा विभागाचे सायबर अधिकारी ख्रिस्टोफर क्रेब्स यांनी सांगितले. चीन, रशिया आणि इराणच्या हॅकर्सचा नेमका काय उद्देश्य असावा याबाबत मायक्रोसॉफ्टने काहीही सांगितले नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *