uddhav thackeray facebook live: Live: बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडं उत्तर नाही असं नाही – उद्धव ठाकरे – uddhav thackeray addressing state live updates


करोनाच्या साथीबरोबरच राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या भाषणाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लाइव्ह अपडेट्स:

>> ऑक्सिजन ही आरोग्य खात्याची प्राथमिकता ठरवलीय. ८० टक्के ऑक्सिजन आरोग्यासाठी वापरला जातोय – मुख्यमंत्री

>> आपलं कुटुंब आपली जबाबदारी आहे. पूर्ण काळजी घ्या. सरकारही सर्व व्यवस्था करत आहे – मुख्यमंत्री

>> मुख्यमंत्रिपदी असल्यामुळं कधीही काहीही करता येत नाही. महाराष्ट्र सरकार खंबीर पावलं टाकतोय – ठाकरे

>> बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडं उत्तर नाही असं नाही – ठाकरे

>> महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्याबद्दल बोलणार आहे – उद्धव ठाकरे

>> ‘पुनश्च हरिओम’ म्हणजे पुन्हा राजकारण असा त्याचा अर्थ नाही.

>> मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढतोय. ग्रामीण भागातही संसर्ग पसरतोय – उद्धव ठाकरे

>> करोनाची दुसरी लाट आलेय की काय अशी वाटण्याची परिस्थिती सध्या आहे – उद्धव ठाकरे

>> उद्धव ठाकरे यांचा लाइव्ह संवाद सुरू

>> सुशांतसिंह राजपूत व कंगनाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्ष

>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी एक वाजता साधणार जनतेशी संवादSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *