Rhea Chakraborty Drug Case: सुशांत-रिया ड्रग्ज कनेक्शन; सातही दलालांना एनसीबीकडून अटक – rhea chakraborty drug case ncb has arrested 7 drug peddler


म.टा. प्रतिनिधी, मुंबईः नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (NCB) अंमली पदार्थांच्या सातही दलालांना रविवारी अटक केली. मुंबई आणि गोव्यात एकाचवेळी केलेल्या कारवाईत एनसीबीचे सह संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने या सात दलालांना शनिवारी गाठून ताब्यात घेतले होते. रात्रभराच्या चौकशीनंतर रविवारी त्यांना अटक करण्यात आली.

अभिनेता सुशांतसिंहची मैत्रिण रिया चक्रवर्ती ही भाऊ शौविक व सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडामार्फत अंमली पदार्थ मागवून ते सुशांतसिंहला देत होती, असे प्रारंभी सीबीआय आणि त्यानंतर एनसीबीच्या तपासात समोर आले.

आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा: आठवले

हल्ला करणाऱ्यांनी आम्हाला विचारून हल्ला केला नाही: संजय राऊत

याबाबत एनसीबी मुंबई क्षेत्राचे सह संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, ‘हे सातही जण चरस व गांजाचा पुरवठा करणारे आहेत. त्यांच्यापैकी करमजित हा चरस व गांजाचा पुरवठा करणारा मुंबईतील सर्वात मोठ्या दलालांपैकी एक आहे. करमजित सातत्याने सुशांतसिंह, रिया व शौविकला अमली पदार्थांचा पुरवठा करीत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळेच अधिक तपासासाठी या सर्व सात जणांना अटक करण्यात आली असून सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *