Nagpur: मटण शिजवून देण्यास नकार, मित्रासह त्याच्या पत्नीवर चाकूने वार – couple attacked by friend for mutton in nagpur


म.टा. प्रतिनिधी, नागपूर: भाजीसाठी ४२ वर्षीय इसमाने चाकूने वार करुन दाम्पत्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना गुरुदेवनगर येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. हुडकेश्वर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोराला अटक केली आहे. मनीष सुरेश काळे (वय ४२,रा. गुरुदेवनगर) हे अटकेतील हल्लेखोराचे तर संतोषकुमार भीमराव नागवंशी (वय ४६) व त्यांच्या पत्नी रुपवंती (दोन्ही रा. श्रीरामनगर) ही जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष याचा संजयगांधीनगर येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. नागवंशी दाम्पत्य श्रमिक आहेत. मनीष व संतोषकुमार हे मित्र आहेत. शुक्रवारी रात्री मनीष याने मद्यप्राशन केले. तो संतोषकुमार यांच्या घरी गेला. रुपवंती यांना भाजी (मटण) करण्यास सांगितले. रुपवंती यांनी नकार दिला. मनीष याने त्यांना शिवीगाळ केली व घरी परतला. काही वेळाने संतोषकुमार आले. रुपवंती यांनी संतोषकुमार यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर संतोषकुमार व रुपवंती दोघेही मनीष याच्या घरी गेले. संतोषकुमार यांनी मनीष याला जाब विचारला. मनीष संतापला. त्याने चाकूने रुपवंती यांच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली. संतोषकुमार यांनी रुपवंती यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मनीष याने संतोषकुमार यांच्यावरही चाकूने हल्ला केला. नागवंशी दाम्पत्य जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पंकज लहाने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. जखमींना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करून मनीषला अटक केली.

संतापजनक! ७० वर्षीय महिलेवर मजुरानं केला बलात्कार

तुकाराम मुंढेंना निरोप देतेवेळी घोषणा, शेकडो समर्थकांविरुद्ध गुन्हे दाखल

गर्लफ्रेंडला भेटायला घरी गेला, तरुणाला बांधून उकळतं पाणी अंगावर ओतलं

पती-पत्नी म्हणून ८ वर्षे संसार केला; मृत्यूनंतर ‘ते’ रहस्य उलगडलं, सगळ्यांना बसला धक्काSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *