ms dhoni: धोनी-वॉट्सनची जोडी जमली; पाहा चौकार आणि षटकारांचा पाऊस Video – ipl 2020 ms dhoni and shane watson smashing bowlers watch video


दुबई: चेन्नई सुपर किंग्जचा संघ या वर्षी आयपीएलमध्ये दोन स्टार खेळाडूंशिवाय खेळणार आहे. उपकर्णधार सुरेश रैना आणि फिरकीपटू हरभजन सिंग या दोघांनी वैयक्तीक कारणामुळे माघार घेतली आहे. हे दोन खेळाडू संघात नसल्यामुळे चेन्नईच्या कामगिरीवर काय परिणाम होणार आहे ते येणाऱ्या काही दिवसात समजेलच. पण सध्या सीएसकेचा संघ धोनीच्या नेतृत्वाखाली जोरदार सराव करत आहे.

वाचा- भारतीय गोलंदाजावरील बंदी संपली; ३७ व्या वर्षी करणार मैदानात पदार्पण
वाचा- पाहा Viral Video धोनीचा षटकार; चेंडू मैदानाबाहेर गायब झाला

चेन्नई संघाच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवासांपूर्वी धोनीने मारलेला चेंडू मैदानाबाहेर गेला होता. आता चेन्नई संघाने महेंद्र सिंह धोनी आणि शेन वॉट्सन यांच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे दोघेही चेन्नईचे स्टार खेळाडू आहेत.

वाचा- विराट म्हणतो, रिकाम्या जागा भरा; करिअर संदर्भातील पोस्ट व्हायरल

धोनी आणि वॉट्सन यांनी मैदानावरील सरावा दरम्यान स्फोटक फलंदाजी केली आहे. या व्हिडिओमध्ये दोघांची फलंदाजी पाहिल्यानंतर स्पर्धेत मोठी खेळी पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटू नये.

वाचा- मुंबई इंडियन्सकडे आहे हा घातक गोलंदज; विकेटचे दोन तुकडे केले, व्हायरल video

गेल्या वर्षी वॉट्सनने अंतिम सामन्यात ८० धावांची खेळी केली होती. पण अखेरच्या षटकात तो बाद झाला आणि चेन्नईचा एक धावाने पराभव झाला. या वर्षी देखील धोनी फलंदाजीच्या जोरावर संघाला विजेतेपद मिळून देण्याचा प्रयत्न करेल.

वाचा- ओसाकाला अमेरिकन ओपनचे विजेतेपद; अशी कामगिरी करणारी पहिली आशियाई महिला

आयपीएलच्या निमित्ताने धोनी जवळपास दीड वर्षानंतर मैदानात परतणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार असून या दोघांनी अनुक्रमे ४ आणि ३ वेळा विजेतेपद मिळवले आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांची संख्या देखील अन्य संघांपेक्षा अधिक आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *