Kangana Ranaut: kangana ranaut : माझ्यावर अन्याय झाला, न्याय मिळेल याची आशा; कंगना राज्यपालांना भेटली – actor kangana ranaut and her sister rangoli meet maharashtra governor bhagat singh koshyari at raj bhavan


मुंबई: शिवसेनेशी झालेला वाद आणि मुंबई महापालिकेने कार्यालयावर केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना राणावत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांकडे मी माझी कैफियत मांडली आहे. माझ्यावर अन्याय झाला असून राज्यपालांनीही माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी आशा आहे, असं कंगना राणावतने सांगितलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी सुमारे २० मिनिटं चर्चा केल्यानंतर कंगनाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यपालांना भेटून मी माझी कैफियत मांडली आहे. गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने मला वागणूक दिली गेली. त्याची संपूर्ण माहिती राज्यपालांनी दिली आहे. राज्यपालांनीही मुलीप्रमाणे माझं म्हणणं ऐकून घेतलं असून मला अश्वस्त केलं आहे, असं कंगनाने सांगितलं.

माझ्यासी अभद्र व्यवहार झाला असून मला न्याय मिळायला हवा. मला न्याय देणं देशभरातील महिलांसाठी महत्त्वाचं आहे. मला लवकरात लवकर न्याय देऊन न्यायव्यवस्थेवरचा महिलांचा विश्वास वाढवायला हवा, असंही तिने सांगितलं. यावेळी कंगनासोबत तिची बहीणही होती. तसेच यावेळी राज्यपाल भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

कंगना रणौतविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार; मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कंगनाची तिच्या घरी जाऊन भेट घेऊन तिची विचारपूस केली होती. त्यानंतर आठवले यांनी राज्यपालांना भेटून कंगना प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती. कंगनावर पालिकेने सूडबुद्धीनेच कारवाई केली असून त्यावर लक्ष देण्याची विनंतीही आठवलेंनी राज्यापालांकडे केली होती.

आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनाची जीभ घसरली

कंगनाच्या समर्थनात रेणुका शहाणे, म्हणाल्या ‘इतकं खाली येण्याची गरज नव्हती’

दरम्यान, महापालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडलं होतं. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला शिवसेनेनं कंगनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानं शिवसेनेला आव्हान दिलं होतं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेच्या वांद्रे पश्चिम येथील एच-पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाच्या पथकाने कंगनाच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यात काही बांधकाम सुरू असल्याचे आढळले. त्यानंतर पालिकेने मंगळवारी प्रशासकीय परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस पाठवली होती. पालिकेचे अधिकारी नोटीस बजावण्यासाठी गेले असता तेथे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नोटिस स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पालिकेने कार्यालयावर नोटीस चिकटवली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *