girl abduct: १४ वर्षीय मुलीचं अपहरण, ज्यूसमधून गुंगीचं औषध देऊन केला बलात्कार – haryana palwal 14 year old girl abducted and raped


पलवल: चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्यानंतर ज्यूसमधून गुंगीचं औषध देऊन एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पलवल परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका तरुणाने आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीचे अपहरण केले. तिला ज्यूसमधून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने मुलगी शुद्धीत आल्यानंतर तिने विरोध केला असता, तिला जीवे मारण्याची धमकी दिली. बलात्कारानंतर पीडित मुलीला आरोपीने उत्तर प्रदेशात तिच्या मामाच्या घरी सोडले आणि फरार झाला.

महिला पोलीस ठाण्याच्या अधिकारी रेखा यांनी सांगितले की, १४ वर्षीय मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ८ सप्टेंबरला रात्री ती घरात झोपली होती. मध्यरात्री एकच्या सुमारास एक तरुण घरात घुसला. त्याने चाकूचा धाक दाखवून तिला दुचाकीवर जबरदस्ती बसवले. त्यानंतर पलवलच्या दिशेने आला. तिथे एटीएममधून पैसे काढल्यानंतर तिला तो एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे ज्यूसमधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. बेशुद्धावस्थेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला उत्तर प्रदेशातील तिच्या मामाच्या घरी सोडले आणि तेथून पसार झाला. पीडितेने मामाला आपबीती सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांना बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी बातम्या वाचा:

होम क्वारंटाइनचा बहाणा; ‘शौकीन’ पतीला पत्नीने तरुणीसोबत रंगेहाथ पकडले

पिंपरी: ऑक्सिजन सिलिंडरचा टेम्पो पळवला, करोना संकटात टंचाई असताना झाली चोरी

धक्कादायक! ऑनलाइन क्लास सुरू असताना शिक्षकाने विद्यार्थिनीला पाठवले अश्लील फोटो

अनैतिक संबंधांत पतीचा अडथळा, पत्नीनं डोक्यात दगड घातला

संतापजनक! ७० वर्षीय महिलेवर मजुरानं केला बलात्कार

गर्लफ्रेंडला भेटायला घरी गेला, तरुणाला बांधून उकळतं पाणी अंगावर ओतलंSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *