coronavirus vaccine updates: चांगली बातमी! ऑक्सफर्डची करोना लस चाचणी पुन्हा सुरू – coronavirus vaccine astrazeneca resumes covid-19 vaccine trial after uk green light


लंडन: ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या करोना प्रतिबंधक लशीची चाचणी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. ब्रिटनमधील औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक प्राधिकरणाने संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर क्लिनिकल चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. लस टोचलेल्या एका स्वयंसेवकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे चाचणी थांबवण्यात आली होती.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनक यांनी सांगितले की, काही सूचनांबाबतची माहिती आताच सार्वजनिक करू शकत नाही. मात्र, स्वतंत्ररीत्या झालेल्या चाचणीत ही लस सुरक्षित आढळली आहे. औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक प्राधिकरणाने केलेल्या तपासणीत लस सुरक्षित आढळल्यामुळे लशीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

वाचा: वुहानच्या प्रयोगशाळेत करोना विषाणूची निर्मिती; चीनमधून पळालेल्या शास्त्रज्ञाचा दावा

या लशीचे पहिल्या दोन टप्प्यात चांगले परिणामही दिसून आले होते. भारतातही या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ब्रिटनमध्ये या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. मात्र, त्यानंतर ही व्यक्ती आजारी पडली. या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कंपनीने ही लस चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला. भारतातही लस चाचणी थांबवण्यात आली. सिरम इन्स्टिट्यूटच्या देखरेखीत ही चाचणी घेण्यात येत आहे.

वाचा:करोना: ‘ही’ लस एक लाख जणांना दिली; एकावरही साइड इफेक्टस नाही

लस संशोधनात सुरक्षितेला अधिक महत्त्व दिले असून त्यासाठी कटिबद्ध असल्याचे एस्ट्राजेनकाने सांगितले. एस्ट्राजेनेकाने सांगितले की कंपनी जगभरातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून लवकरच चाचणीबाबत त्यांना सूचना देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले.

वाचा: करोना: १५० हून अधिक लशींवर संशोधन; ‘अशी’ आहे लस विकसित करण्याची पद्धत

लस कधी उपलब्ध होणार ?

कंपनीचे सीईओ पास्कल सॉरिएट यांना लस लवकर उपलब्ध होण्याची आशा आहे. त्यांनी सांगितले की, सगळ्या जगाचे लक्ष या लशीवर लागले आहे. त्यामुळेच चर्चा होत आहे. या वर्षा अखेर लस मंजुरीसाठीचा डेटा उपलब्ध होईल, असेही त्यांनी म्हटले. लशीला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा वापर सुरू करण्यात येईल. त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लशीची पहिली खेप उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *