Corona Vaccine: करोनावरील लस नक्की कधी येणार?, आरोग्य मंत्र्यांनी दिले ‘हे’ उत्तर – the corona vaccine could be available in the first quarter of next year says union health minister dr harsh vardhan


नवी दिल्ली: देशात करोनाच्या रुग्णांमध्ये तीव्र गतीने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ९० हजारांहून अधिक रुग्णांची दररोज वाढ होत आहे. या कारणामुळे लोक करोनावरील लशीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये विविध लशींवर काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सध्या लस कधी येणार याची तारीख निश्चित करण्यात आलेली नसली, तरी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लस उपलब्ध होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. संडे संवाद या सोशल मीडियाच्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली.

ब्रिटिश रेग्युलेटरने एस्ट्राजेनेका या औषध कंपनीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर कंपनीने कोविड-१९ लशीचे मानव परिक्षण पुन्हा एकदा सुरू केल्याचे कंपनीने सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे हे वक्तव्य आले आहे. एक स्वयंसेवक आजारी पडल्यानंतर लशीचे परिक्षण थांबवण्यात आले होते. यानंतर भारतात देखील या लशीच्या चाचणीवर बंदी घालण्यात आली होती.

मानवी परीक्षणात बाळगली जात आहे सावधगिरी

लशीचे मानवी परीक्षण करते वेळी अत्यंत सावधगिरी बाळगली जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकांना दिली आहे. लशीची सुरक्षा, खर्च, कोल्ड-चेन आवश्यकता, उत्पादन, कालमर्यादा अशा मुद्द्यांवर देखील खोलवर चर्चा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. एकदा का करोनावरील लस तयार झाली की मग ज्या लोकांना लशीची सर्वाधिक आवश्यकता आहे, अशा लोकांना ती प्राधान्याने दिली जाईल, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी तासभर सोशल मीडियावर करोना विषाणूशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि लोकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली.

क्लिक करा आणि वाचा- करोना संसर्गाव्यतिरिक्त, नैराश्य आणि आत्महत्यांमध्ये वाढ; पाहा कारणे!

देशात सुरू आहे अनेक लशींचे परीक्षण

देशात अनेक लशींचे परीक्षण सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र, सर्वात प्रभावी कोणती लस ठरेल याबाबत आताच अंदाज बांधता येत नाही, मात्र सन २०२१ च्या पहिल्या तिमाहीत लशीता नेमका परिणाम काय आहे हे लक्षात येईल असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. लशीवर विचार करण्यासाठी तज्ज्ञांचा एक गट स्थापन करण्यात आला असून, हा गट संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे, असेही डॉ. हर्षवर्धन पुढे म्हणाले. मात्र, परीक्षणाबाबतचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर वेळ जाऊ नये यासाठी कंपन्या ताबडतोब मोठ्या प्रमाणावर लशीचे उत्पादन सुरू करतील, असेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- १०५ वर्षीय आज्जीबाईंची करोनावर मात; घरीच घेतले उपचार

क्लिक करा आणि वाचा- करोनामुक्त नागरिकांना आरोग्य मंत्रालयाचा सल्ला, च्यवनप्राश खा आणि हळदीचं दूध प्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *