car crashed into canal: धरणाच्या कालव्यात कोसळली कार; सुदैवाने ५ जणांचे प्राण वाचले – car crashed into canal 5 people saved from drowning


म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगरः खेड तालुक्यातील सातकरस्थळ येथे चारचाकी वाहनचालकाचे नियत्रंण सुटल्यामुळे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात चारचाकी पडली. स्थानिक तरुणांनी वेळीच कारमधील तीन मुलांसह पती-पत्नीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

होलेवाडी (ता खेड ) गुरुदेव साम्राज्य येथे वास्तव्य असलेले प्राथमिक शिक्षक गणेश मगर आज आपल्या बलेलो मारुती कारमधून पत्नी, त्यांचा एक आणि शेजारील दोन मुले अशा पाच जनांसह काळेवाडी ,ता खेड परीसरात असलेल्या सौरंग्या डोंगरावरील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते.परत येताना दुपारी सातकरस्थळ येथील चासकमान डाव्या कालव्याच्या पुलावरून वळण घेताना त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग लॉक होऊन आहे त्या वेगात जागेवर वळण घेऊन ती थेट कालव्याच्या प्रवाहात जाऊन पाण्यावर तरंगू लागली.अशाही स्थितीत चालक असलेल्या गणेश मगर यांनी सतर्कतेने खिडकीच्या काचेतून पाण्यात उडी मारली. त्याच खिडकीला धरून गाडी ओढून कडेला नेत मदतीसाठी आरडाओरडा केला. कपडे धूत असलेल्या महिलांनी आवाज ऐकून त्यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना हाक दिली तत्काळ तुषार सातकर,स्वप्नील सातकर,अशोक सातकर ,संदीप सातकर, विशाल सातकर या युवकांनी पाण्यात उड्या मारल्या. गाडी तरंगत प्रवाहात वाहात चालली होती आणि गाडीतील महिला आणि मुले जिवाच्या आकांताने ओरडत होती. पाण्यात उड्या मारलेल्या युवकांनी गाडीचे दरवाजे बाहेरून उघडले. आतील मुलांना व महिलेला घाईघाईने बाहेर काढले. त्यांना कालव्याच्या काठाला आणले. दरम्यान गाडीत पाणी शिरून गाडी बुडाली होती. वेळेत सर्वांना बाहेर काढल्याने पाच जणांचा जीव वाचला.

पाण्यात गाडी तरंगत असताना आजूबाजूला असलेल्या युवकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या घेऊन गाडीतील पाच जणांना बाहेर काढल्याने युवकांच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *