Amey Khopkar taunts Sanjay Raut: राज ठाकरेंमुळंच तुमचा लेख वाचला जातोय; मनसेने राऊतांना सुनावले – mns leader amey khopar gives befitting reply to sanjay raut over thackeray brand


मुंबई:ठाकरे ब्रॅण्ड‘ची आठवण देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घालणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जोरदार टोला हाणला आहे. ‘ठाकरे ब्रॅण्डची चिंता तुमच्यापर्यंत ठेवा. तुमचा आजचा लेख राजसाहेबांच्या उल्लेखामुळंच सगळीकडं व्हायरल होतोय हे लक्षात ठेवा,’ असा चिमटा खोपकर यांनी राऊतांना काढला आहे.

‘ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रॅण्ड आहे. राज ठाकरे हे सुद्धा या ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व मुंबईवरून सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’ असं म्हणत संजय राऊत यांनी ‘सामना’तील आजच्या लेखातून राज ठाकरे यांना साद घातली आहे. राऊत यांच्या या लेखावर मनसेकडून खोचक प्रतिक्रिया येत आहेत.

वाचा: माजी सैनिकास मारहाण: काँग्रेसने भाजपची ‘अशी’ केली कोंडी

संदीप देशपांडे यांच्यानंतर आता अमेय खोपकर यांनी ट्वीट करून राऊतांच्या ऑफरचा समाचार घेतला आहे. राऊतांना ‘शॅडो संपादक’ अशी उपमा देतानाच, ‘महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रॅण्ड एकच… राजसाहेब ठाकरे,’ असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

वाचा: संजय राऊतांच्या ‘ठाकरे ब्रॅण्ड’ला नीतेश राणेंचं प्रत्युत्तर

‘सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रॅण्डचं कसं होणार अशी चिंता वाटते आहे. पण ती चिंता तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रॅण्डबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. तुमचा आजचा लेख राजसाहेबांचा उल्लेख असल्यामुळंच व्हायरल होतोय हे लक्षात ठेवा,’ असं खोपकर यांनी राऊतांना सुनावलं आहे.
वाचा: ‘फडणवीस ड्रायक्लीनर आहेत हे खडसेंचं वाक्य मला पटलं’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *