Akshay Kumar-Kangana Ranaut: ‘अक्षय कुमार सारख्यांनी तरी मुंबईच्या अवमानाविरोधात बोलायला हवे होते’ – mumbai pok row: big stars like akshay kumar must have reacted, says shiv sena mp sanjay raut


मुंबई: कंगना राणावत या नटीने मुंबईबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल किमान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीनं बोलायला हवं होतं. कंगनाचं मत संपूर्ण सिनेसृष्टीचं नाही हे सांगायला हवं होतं. किमान अक्ष कुमार सारख्या मोठ्या कलावंतांनी समोर यायला हवं होतं. मुंबईनं त्यांनीही दिलं आहे,’ असं परखड मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

सामनातील लेखात संजय राऊत यांनी कंगना राऊत हिनं मुंबईबद्दल केलेलं वक्तव्य व त्यानंतरच्या एकूण घडामोडींवर भाष्य केलं आहे. मुंबईबद्दल कोणी बोलल्यास त्यावर प्रतिक्रिया देण्याचा मराठी माणसाला हक्कच आहे, असं त्यांनी ठणकावलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलावंतांनी बाळगलेल्या मौनाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘टसंपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठय़ा कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. मुंबईने प्रत्येकाला दिले आहे. पण मुंबईबाबत कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांना यातना होतात,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

वाचा: कंगना, सुशांतवरून गोंधळ सुरू असताना मनसे नेमकं काय करतेय?

‘एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एकेरी भाषेत बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राममंदिरच होते, असा कांगावा तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करून ती सांगत असलेल्या ‘पाकिस्ताना’त बांधले. मुंबईला पाकिस्तान बोलायचे व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिकल स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ?,’ असे प्रश्नही त्यांनी केले आहेत.

मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचाच!

‘जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबाडण्यासाठी व पैसे कमवण्यासाठीच आहे. मग मुंबईबद्दल कोणी काही बोलले तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून मराठी अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे,’ असंही त्यांनी ठणकावलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *