9/11 terror attack: ९/११ दहशतवादी हल्ला: ‘या’ राजघराण्यातील सदस्यांची चौकशी होणार! – saudi royals must answer questions in 9/11 lawsuit said us judge


वॉशिंग्टन: अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील दोन सदस्यांची चौकशी करण्यात येणार आहे. अमेरिकेतील कोर्टाच्या न्यायाधीशांनी याबाबतचे निर्देश दिले. अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींवर दहशतवादी हल्ला झाला होता. अल कायद्याच्या दहशतवाद्यांनी विमान अपहरण करून इमारतीवर विमाने धडकवली होती.

अमेरिकेतील मॅजिस्ट्रेट सारा नेटबर्न यांचा सीलबंद आदेश गुरुवारी उघडण्यात आला. या आदेशानुसार, राजघराण्यातील दोन सदस्यांना काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. याबाबतची कार्यवाही करण्यासाठी सौदी अरेबिया सरकारला विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात नेमके कशाप्रकारे, साक्ष-जबाब नोंदवण्यात येणार हे स्पष्ट झाले नाही. कोर्टाच्या दस्ताऐवजानुसार राजघराण्यातील सदस्यांपैकी युवराज बिन सुल्तान यांचे नाव असून ते सौदी अरेबियाच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. त्याशिवाय १९८३ ते २००५ दरम्यान ते सौदी अरेबियाचे अमेरिकेतील राजदूत होते.

वाचा: चीनला आणखी एक धक्का; भारताने अमेरिकेने ‘या’ देशासोबत केला करार

अमेरिकेतील ९/११ हल्ल्यातील पीडितांच्या काही नातेवाईकांनी सौदी अरेबियाच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले. सौदी अरेबियाच्या काही एजेंट्स, अधिकाऱ्यांनी जाणूबुजून अल कायदा आणि त्याचा प्रमुख ओसामा बिन लादेनला पाठिंबा दिला असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, सौदी अरेबियाच्या सरकारने या हल्ल्याशी संबंध नसल्याचे फार आधीच स्पष्ट केले आहे.

वाचा: कुस्तीपटू नाविदला फाशी; सरकारविरोधी आंदोलनात होता सहभाग

वाचा: अमेरिका: लाखो एकर जंगलाला भीषण आग, शेकडो घरे आगीत भस्मसात

सुमारे १९ वर्षांपूर्वी झालेल्या या हल्ल्यामुळे अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगच हादरलेे होते. अल कायद्याच्या दहशतवाद्यांनी तीन विमानांचे अपहरण केले होते. त्यातील दोन विमानेही वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींवर धडकवण्यात आली. तर, एक विमान पेंटागॉनच्या इमारतीवर धडकण्यात आले होते. हा हल्ला अतिशय भयावह होता. सुमारे दोन हजार जणांचा यात मृत्यू झाला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *