सुशांतसिंह राजपूत: रिया चक्रवर्तीचा खुलासा, सांगितलं कुठे आणि केव्हापासून लागली सुशांतला ड्रग्जती लत – sushant singh rajput case rhea chakraborty claims famous filmmaker addict sushant for drugs


मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रिपोर्टनुसार तिने ड्रग्ज स्कँडलमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत. या लोकांचा सुशांतशी कसा संबंध आला हेही रियाने या चौकशीत स्पष्ट केलं.

रिलेशनशिप दरम्यान सुशांतने रियाला काय सांगितलं

एका मनोरंजन पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रियाने दावा केला की सुशांतला एका फिल्ममेकअरने ड्रग्जचं व्यसन लावलं होतं. तो सुशांतला ज्या पार्ट्यांमध्ये कोकेन, एलएसडी आणि गांजा मिळेल अशा पार्टीत घेऊन जायचा. सीएनएन न्यूज 18 च्या वृत्तानुसार सुशांतने रिया चक्रवर्तीला त्यांच्या रिलेशनशिप दरम्यान या सर्व गोष्टी सांगितल्याचं ती म्हणाली.

कॅन्सरनंतरही संजयने सुरू ठेवलं शूटिंग, अभिनय प्रेम की कॉन्ट्रॅक्टची भीती?

रियाने दोन मोठ्या कलाकारांचीही घेतली नावं

या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की सिनेसृष्टीत या सर्व गोष्टी किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने सुरू आहेत याचाही खुलासा केला. यावेळी रियाने सुशांतला अमली पदार्थांचं सेवन करायला लावणाऱ्या दोन बड्या सेलिब्रिटींची नावं घेतली. सुशांतच्या लोणावळा फार्महाऊस फक्त बॉलिवूडकरांच्या ड्रग्ज पार्ट्या व्हायच्या असंही तिने चौकशीत मान्य केलं.

नट्टू काका फेम घनश्याम नायक यांची झाली सर्जरी, गळ्यातून काढल्या आठ गाठी

२५ पैकी तीन बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर आली

दरम्यान, रिया म्हणाली की ती या पार्ट्यांमध्ये कधीच गेली नाही. तिने सांगितलं की या पार्ट्यांमध्ये काही कलाकार त्या पार्ट्यांमध्ये येणाऱ्या इतर कलाकांना अमली पदार्थ देत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर टाइम्स नाऊच्या अहवालानुसार रियाने बॉलिवूडच्या २५ सेलिब्रिटींची नावं एनसीबीकडे दिली आहेत. यातील सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि सायमन खंबाटा यांची नावं आतापर्यंत समोर आली आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *