सारा अली खान: एकाच डीलरकडून रिया- सारा विकत घ्यायचे ड्रग्ज, एनसीबी लावणार आता तपास – sara ali khan rakul preet singh rhea chakraborty reveals names in sushant singh rajput drug use


मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रगचा अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) याची चौकशी करण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ती सध्या भायखळा कारागृहात आहे. दरम्यान, रियाने सारा अली खान, रकुलप्रीत सिंग, सीमन खंभाटा, रोहिणी अय्यर आणि मुकेश छाबरा यांच्यासह २५ सेलिब्रिटींची नावं घेतल्याचं समोर आलं आहे.

रियासोबत हे सेलिब्रिटीही अमली पदार्थांचं सेवन करत होते. रियाने एनसीबी एजन्सीला स्पष्ट शब्दात सांगितलं की बॉलिवूडमध्ये ८० टक्क्याहून स्टार ड्रग्ज घेतात. रियाने घेतलेल्या २५ जणांचीही आता एनसीबी चौकशी करणार. मीडिया रिपोर्टनुसार एनसीबी आता सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि सायमन खंभटा यांना चौकशीसाठी समन्स पाठवू शकते. रियाच्या जबाबात असं उघड झालं की रिया ज्याच्याकडून अमली पदार्थ विकत घ्यायची त्याच व्यक्तीकडून साराही अमली पदार्थ घ्यायची. आता त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एनसीबी तिला समन्स पाठवू शकते.

रिया चक्रवर्तीचा खुलासा, सांगितलं कुठे आणि केव्हापासून लागली सुशांतला ड्रग्जती लत

चौकशी दरम्यान ड्रग टीमबद्दल रिया चक्रवर्तीने ज्या दुसऱ्या अभिनेत्रीचं नाव घेतलं ती म्हणजे रकुलप्रीत सिंग. रकुल ही मुळची दिल्लीची आहे आणि सध्या ती तेलंगणामध्ये तेलगू सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. एनसीबी तिलाही चौकशीसाठी लवकरच समन्स पाठवू शकते.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीने शनिवारी मुंबई आणि गोव्यातील अमली पदार्थांच्या विक्रेत्यांच्या ठिकाणांवर छापा टाकला आणि सातजणांना ताब्यात घेतलं. त्यापैकी कमरजित (केजी) याला अटक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळाले आहेत. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये अचानक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ड्रग्ज टेस्टमध्ये सापडू नये म्हणून अभिनेत्रीने यूरिनमध्ये मिसळलं पाणी, चालाखी पकडली गेली

मुंबईत अंधेरी आणि पवई येथे छापे टाकण्यात आले. या छाप्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. अनुज स्वत: वांद्रे येथे राहतो आणि अमली पदार्थांचा व्यसनाधीनदेखील आहे. त्याने सांगितले की तो रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांना ड्रग्ज पुरवायचा. केजीबद्दल म्हटलं जात की रियानेच त्याचं नाव घेतलं होतं.

केजीचा संबंध फक्त शौविक आणि मिरांडापुरताच मर्यादीत नाहीये. तो कॅपरी हाइट्समध्ये ड्रग्स पुरवतो. तो बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सना ओळखतो. तपासात हेही समोर आलं आहे की केजीने स्वत: शौविक, दिपेश आणि मिरांडाला भेटून त्यांना ड्रग्ज पुरवले आहेत. यावरून शौविक करमजितशी थेट संपर्कात होता हे कळतं. आता अनुजच्या मागून एनसीबी ड्रग सिंडिकेटशी संबंधित इतर लोकांचा शोध घेणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *