President rule: राष्ट्रपती राजवट लागू करा; ‘त्या’ नौदल अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी – former navy officer who was attacked in mumbai daughter demands president rule


मुंबई: शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आलेल्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्याच्या मुलीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या वडिलांना शिवसैनिकांनीच मारहाण केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह कार्टून फॉरवर्ड केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी मदन शर्मा या निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याला शिवसेनाच जबाबदार असल्याचं शर्मा यांची कन्या शीला यांनी म्हटलं आहे. एक कार्टून फॉरवर्ड केल्याने माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या. शिवसेनेच्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्लाही केला. त्यानंतर पोलीस घरी आले आणि त्यांनी वडिलांना सोबत येण्यासाठी जबरदस्ती केली. आम्ही हल्ल्याप्रकरणी एफआरआय नोंदवला आहे, असं सांगतानाच राज्यात माणूसकी नावाची गोष्टच उरलेली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असं शीला यांनी सांगितलं.

दरम्यान, कांदिवलीतील समतानगर येथे लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास काही शिवसैनिकांनी हा हल्ला केला. मदन शर्मा या निवृत्त अधिकाऱ्यावर हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मदन शर्मा यांच्यावरील हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यात शर्मा यांना पाठलाग करून पकडण्यात आल्याचे व मारहाण करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्याबाबत शर्मा यांच्या मुलाने अधिक माहिती दिली.

CM ठाकरेंचे कार्टून फॉरवर्ड केले; निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांचा हल्ला

शर्मा यांच्यावर शिवसेनेनेच हल्ला केल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. वयाची साठी उलटलेल्या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला सहाजण मिळून मारहाण करतात, त्यांना भामटे नाही तर काय म्हणावे?, असा सवाल भातखळकर यांनी केला. या मारहाण प्रकरणी जनता शिवसेनेला माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज दुपारी १२ वाजता शर्मा यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहेत. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

वाचा: कंगनाचे शिवसेनेवर हल्ले सुरूच; आता शेअर केला बाळासाहेबांचा व्हिडिओ

वाचा: आमच्यासाठी कंगना एपिसोड संपला; शिवसेना बॅकफूटवर?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *