passenger vehicle sale increased: वाहन उद्योग रुळावर; प्रवासी वाहन विक्रीचा टाॅपगिअर – passenger vehicle sales increased by 14 percent


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सातत्याने गेले ११ महिने अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात असलेल्या वाहन उद्योगासाठी ऑगस्ट महिना सुवार्ता घेऊन आला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनविक्रीत १४.१६ टक्के वाढ दिसून आली आहे. या महिन्यात २,१५,९१६ प्रवासी वाहने देशात विकली गेल्याची माहिती वाहन उद्योगाची मध्यवर्ती संघटना असलेल्या सियामने शुक्रवारी दिली.

पेट्रोल-डिझेल स्वस्त ; हा आहे आजचा भाव
सियामने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आधीच्या महिन्यात १,८९,१२९ प्रवासी वाहने विकली गेली होती. ऑगस्टमध्ये यात चांगल्या प्रकारे वाढ झाल्याने प्रवासी वाहनांची विक्री सकारात्मक वाढीअंतर्गत गणली जाणार आहे. यापूर्वी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वाहन उद्योग क्षेत्राने सकारात्मक वाढ नोंदवली होती. त्यानंतर आर्थिक मंदीचे वातावरण आणि करोना संसर्ग या दोन्हींमुळे हे क्षेत्र अक्षरशः नागवले गेले.

७७ वर्षांच्या उद्योजकाची कमाल; टाळेबंदीत आणला IPO, ५४ हजार कोटींची बोली
वाहनांची विक्री सरासरी वाढली असताना, स्कूटरच्या विक्रीत मात्र घसरण झालेली दिसून आली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये ५,२०,८९८ स्कूटरची विक्री झाली होती. त्या तुलनेत यावर्षी ऑगस्टमध्ये ४,५६,८४८ म्हणजे १२.३ टक्के कमी स्कूटर विकल्या गेल्या आहेत. तिचाकींची विक्रीही यावर्षी घसरली आहे. करोनामुळे रिक्षांच्या व्यवसायावर गदा आली असल्याचा हा परिणाम मानला जात आहे. ऑगस्ट २०१९मध्ये ५८,८१८ तिचाकी विकल्या गेल्या होत्या. त्या तुलनेत यंदा ७५.२९ टक्के कमी म्हणजे १४,५३४ तिचाकींची विक्री होऊ शकली आहे.

डीमॅट खाते उघडताय; ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
ऑगस्टमध्ये वाहनविक्रीत चांगली वाढ झाल्यामुळे या उद्योगाचे मनोधैर्य वाढणार आहे. ऑगस्ट २०१९ मधील विक्री आधारभूत मानली गेली आहे. परंतु ही विक्री कमी होती. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये प्रवासी वाहनांमध्ये ३२ टक्के वाढ कमी झाली तर दुचाकींमध्ये २२ टक्के वाढ कमी झाली होती, असे सियामचे अध्यक्ष
केनेची अयुकावा यांनी सांगितले.

वाहनविक्री

वाहने ऑगस्ट २०२० ऑगस्ट २०१९ वाढ (टक्के)
प्रवासी कार १,२४,७१५ १,०९,२७७ १४.१३
युटिलिटी वेहिकल ८१,८४२ ७०,८३७ १५.५४
व्हॅन ९,३५९ ९,०१५ ३.८२
दुचाकी १५,५९,६६५ १५,१४,१९६
मोटरसायकल १०,३२,४७६ ९,३७,४८६ १०.१३

वाहन उद्योग पुढील वाटचालीबाबत सकारात्मक आहे. या सणासुदीच्या काळात वाहन उद्योगाची वाढ वेगाने होईल यात शंका नाही.

– राजेश मेनन, महासंचालक, सियामSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *