ms dhoni: IPL2020: महेंद्रसिंग धोनीचा यावर्षीच्या आयपीएलसाठी मास्टरस्ट्रोक, ऐकाल तर चक्रावाल – good news for ms dhoni because chennai super kings fast bowler josh hazlewood is in good form


चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एखादा निर्णय समजणे फार कठीण असते. कारण धोनीकडे जो दृष्टीकोन आहे, तो सध्या कोणत्याही कर्णधाराकडे दिसत नाही. यावर्षीच्या आयपीएलसाठी धोनीचा एक मास्टरस्ट्रोक आता समोर आला आहे. पण धोनीने या गोष्टीचा विचार २०१९ सालीच केला होता. जवळपास एका वर्षापूर्वी घेतलेला धोनीचा हा निर्णय किती योग्य होता, ते आता पाहायला मिळत आहे.

धोनी कधी कोणता निर्णय घेईल, हे सांगता येत नाही. त्यामुळेच त्याच्या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसत असतो, अशाच एका गोष्टीचा विचार धोनीने २०१९ साली केला होता. त्यावेळी सर्वांनाच धोनीच्या या निर्णयाचा धक्का बसला होता. पण या आयपीएलमध्ये धोनीचा हा निर्णय मास्टरस्ट्रोक ठरू शकतो, असे दिसत आहे.

महेंद्रसिंग धोनी

आपल्या संघात कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, हे धोनी विचारपूर्वक ठरवत असतो. काही वर्षांपूर्वी त्याचा आशिष नेहराला संघात घेण्याचा निर्णयही धक्कादायक होता. पण नेहराने त्यावर्षी मैदान गाजवले होते. जेव्हा २०१९ साली खेळाडूंची लिलाव झाला, त्यावेळीही धोनीने असाच एक निर्णय घेतला होता. जो निर्णय किती योग्य होता, हे आता दिसत आहे.

धोनीने २०१९ च्या लिलावात कोणताही संघ ज्याच्यावर बोली लावत नव्हता त्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला संघात घेतले होते. कोणीही बोली लावत नसताना धोनीने जोशला संघात घेतल्यावर सर्वांनाच धक्का बसला होता. जोशला दोन कोटींच्या बेसप्राइजवर चेन्नईने आपल्या संघात स्थान दिले होते. जोश हा ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून फार कमी क्रिकेट खेळतो असे म्हटले जात होते. पण नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच जोशची नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळाली. जोशने या सामन्यात १० षटकांमध्ये २६ धावा देत तीन बळी मिळवले होते. त्याचबरोबर तीन षटके निर्धावही टाकली होती. त्यामुळे जोश नावाचे ट्रम्पकार्ड धोनी यावेळी आयपीएलमध्ये नक्कीच वापरणार असल्याचे दिसत आहे. धोनीचा हा मास्टरस्ट्रोक आता किती चांगले निकाल देऊन जातो, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *