Mayor Kishori Pednekar: फ्लॅट हडप केल्याचं सिद्ध करा, शिक्षा भोगेन; महापौरांचं सोमय्यांना आव्हान – mumbai mayor kishori pednekar has captured illegally residential flat: kirit somaiya


मुंबई: लोअर परळ येथील एका सोसायटीतील फ्लॅट हडप केल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी फेटाळून लावला आहे. सोमय्या यांनी आरोप सिद्ध करावेत. पाहिजे ती शिक्षा भोगेन. बिनबुडाचे आरोप करू नये, असं आव्हानच महापौरांनी दिलं आहे. तर, माझ्याकडे कागदोपत्री पुरावे असून एसआरएच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला ही माहिती दिली असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोअर परळच्या गोमाता नगर इमारत क्रमांक-२ मधील ६०१ क्रमांकाचा फ्लॅट हडप केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. या फ्लॅटमध्ये महापौरांनी त्यांचं कार्यालय थाटलं होतं आणि त्याबाबतची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली होती, असा दावा करतानाच सोमय्या यांनी महापौरांचं शपथपत्रंच जाहीर केलं. हा फ्लॅट झोपडपट्टी पूनर्वसनातील लोकांसाठी राखीव आहे. महापौरांच्या कुटुंबीयांसाठी नाही, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

ही तर वादमाफियांची पोटदुखी; ‘मुंबई’वरून शिवसेनेचा विरोधकांवर पुन्हा हल्ला

राष्ट्रपती राजवट लागू करा; ‘त्या’ नौदल अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

महापौर पेडणेकर यांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपने हवेत आरोप करू नये. त्यांनी आरोप सिद्ध करावेत. हवी ती शिक्षा भोगेन, असं आव्हानच महापौर पेडणेकर यांनी केलं. तर मी फ्लॅट लाटला हे सिद्ध करा. चुकीचे आरोप करू नका. एका महिलेवर आरोप करताना लाज वाटत नाही का?, असा संतापही महापौरांनी व्यक्त केला. तर, महापौर ज्या भाषेत बोलत आहेत. ती चुकीची असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही भाषा ऐकून कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

कंगनाच्या बांधकामाला समर्थन आहे का?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *