Maratha reservation: Maratha Reservation : …तर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील; संभाजी ब्रिगेडचा इशारा – maratha reservation : sambhaji brigade warns state government


पुणे: केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे मराठा आरक्षणाचा बळी दिला जात आहे. पण आम्ही ५० कार्यकर्त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. प्रसंगी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकाही सादर करावी, असं सांगतानाच अन्यथा आरक्षण न मिळाल्यास मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा इशारा संभाजी ब्रिगेडने आज दिला.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यावर संभाजी ब्रिग्रेडने आज भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी संभाजी ब्रिगेडने हा इशारा दिला. मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कमी पडले. त्यामुळे राज्य सरकारने आपली चूक सुधारून लवकरात लवकर कोर्टात पुनर्विचार याचिका करावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेशही काढावा, असं संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी सांगितलं. राम मंदिर, तीन तलाक आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेते, मग मराठा आरक्षणासाठी का घेत नाही? मराठा आरक्षण हा सुद्धा श्रद्धा आणि अस्थेचा विषय असून केंद्र आणि राज्याने आपल्या राजकारणात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

राज्यातील आघाडी सरकार केंद्र सरकारच्या नाकावर टिच्चून आलं आहे. राज्यातलं सरकार सत्तेत कसं आलं. त्यात आम्हाला पडायचं नाही. पण तुमच्या राजकारणासाठी आमचा बळी देऊ नये. कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्याची जबाबदारी जशी सत्ताधाऱ्यांची आहे, तसेच विरोधकांनीही पुढे येऊन या कामी समन्वय साधावा. सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून केंद्राकडे आरक्षणाचा पाठपुरावा केला तर आरक्षण मिळण्यात अडचण होणार नाही, असंही संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती; चंद्रकांत पाटलांनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी

मराठा आरक्षण स्थगितीमुळे व्यथित

हा मराठा तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तो सुटला नाही तर मराठा तरुण नक्षली मार्गाकडे जातील, अशी भीती व्यक्त करतानाच तरुणांनी व्यथित होऊ नये. आरक्षणासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये. तुमच्या व्यथा आमच्याकडे मांडा. तुमच्या हाताला रोजगार देण्याचं काम आम्ही करू. तुमच्या शंका आणि प्रश्नाचं निरसनही आम्ही करू. पण कोणताही अततायी मार्गाचा अवलंब करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

अनपेक्षित, धक्कादायक आणि आश्चर्यकारक!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *