entertainment news News : सुरेखा सिक्रींच्या प्रकृतीत सुधारणा; आर्थिक मदतीसाठी सरसावले ‘हे’सहकलाकार – surekha sikri health update co actors come forward for financial help


मुंबई :दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘बधाई हो‘ या चित्रपटात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेली आजी, अर्थात अभिनेत्री सुरेखा सिक्री सध्या आजारी आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

ही बातमी ऐकल्यावर त्याच सिनेमात त्यांच्या मुलाची भूमिका केलेले अभिनेता गजराज राव पुढे आले आणि त्यांनी सुरेखा यांच्या सेक्रेटरीशी संपर्क साधून त्यांना लागेल ती मदत करायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर सिनेमाचे दिग्दर्शक अमित शर्मा हेदेखील त्यांना पूर्ण मदत करत आहेत. ‘मी सध्या गोव्यात असलो, तरी सुरेखा यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्यांच्या उपचारात कसलीही कमतरता येणार नाही यासाठी प्रयत्न करेन’, असं ते म्हणाले.
बदल करायचा म्हणून मी कोणताही बदल करणार नाही:परेश रावल
‘बधाई हो’ हा एका महत्त्वाच्या विषयावर आधारित एक कौटुंबिक सिनेमा होता. त्यातलं कुटुंब एकमेकांना साथ देणारं दाखवलं गेलं होतं. पडद्यामागे देखील त्यातले कलाकार एकमेकांना तशीच साथ देताना दिसत आहेत.
कंगना झाशीची राणी तर… प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली

ज्यूस पिताना आला ब्रेन स्ट्रोक, उपचारांसाठी मागितली आर्थिक मदत
मंगळवारी (८ सप्टेंबर) ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे अचानक सुरेखा यांची प्रकृती बिघडली.परिचारिकाने सांगितलं की, सकाळी ११ च्या सुमारास त्या घरी ज्यूस घेत होत्या तेव्हा अचानक त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. सुरेखा यांची परिचारिका त्यांना घेऊन क्रिटी केअर रुग्णालयत पोहोचली. इथं त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *