Eknath Khadse: Eknath Khadse : काही लोकांच्या व्हिडिओ क्लिप्स, फोटो उघड केल्यास हादरा बसेल; खडसेंचा इशारा – many leader will be shocked if video clips and documents were revealed: eknath khadse


मुंबई: माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडिओ क्लिप्स, फोटो आणि कागदपत्रे आहेत. ती समोर आली की हादरा बसेल, अशी इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. तर, देशहितासाठी या व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो बाहेर आलेच पाहिजे, अशी मागणी काँग्रसेने केली आहे.

मागे मी एक विधान केलं होतं. त्यात मी काही गोष्टी उघड केल्यातर हादरा बसेल असं सांगितलं होतं. देशाला हादरा बसेल असं म्हटलं नव्हतं. माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडिओ क्लिप्स, फोटो आणि कागदपत्रं आहेत. त्यांच्यासारख्या चुका मी केल्या नाहीत हे मी वरिष्ठांना दाखवून दिलं आहे. पण मी इतक्या पातळीवर जाऊन राजकारण करणार नाही, असंही ते म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

खडसे यांनी हा इशारा दिल्यानंतर लगेचच काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी ट्विट करून देशहितासाठी ही व्हिडिओ क्लिप्स बाहेर आणण्याची मागणी केली आहे. भाजपाच्या घरातील धुण्यांमध्ये अनेक धुणी डाग पडलेली आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस क्लीन चिट देऊन सर्व ड्रायक्लीन करून टाकतात. देशहितासाठी आपल्याकडील सर्व व्हिडिओ व फोटो जनतेसमोर आणावेत. जनतेला ठरवू द्या ड्रायक्लीन करायचे की विल्हेवाट लावायची! भाजपा नेत्यांवरील ये डाग अच्छे नहीं!, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. नाथाभाऊंनी त्यांच्याकडे असलेले भाजपाच्या कोणत्यातरी नेत्यांचे व्हिडिओ क्लीप व फोटो देशहितासाठी जनतेसमोर आणले पाहिजेत. त्यांच्या गप्प राहण्यामुळे भाजपाच्या माध्यमातून जनहितविरोधी व ज्यांचे चरित्र संशयास्पद आहे असे नेतृत्व जनतेवर लादले जात असेल तर ते उचित नाही, असा चिमटाही सावंत यांनी केला आहे.

Eknath Khadse : कन्येची शपथ घेऊन फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती; खडसेंचा गौप्यस्फोट

खडसे आणखी काय म्हणाले?

या मुलाखतीत खडसे यांनी अनेक गौप्यस्फोटही केले आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यांनी त्यांच्या कन्येची शपथ घेऊन मला राज्यपाल करणार असल्याचं सांगितलं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण नंतर चार दुसरीच नावं आली, असा दावाही त्यांनी केला आहे.

Eknath Khadse: फडणवीस-अजितदादांच्या चार दिवसांच्या संसारावर खडसेंची फटकेबाजी!

Eknath Khadse: महाराष्ट्रात केलं ते बिहारात करू नका!; फडणवीसांवर खडसेंचे हल्ले सुरूचSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *