CSK: चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद धोनीला नाही तर ‘या’ दिग्गज खेळाडूला मिळणार होते… – ‘csk wanted virender sehwag as their captain but…,’ – former player reveals how ms dhoni joined super kings


महेंद्रसिंग धोनी हा एक चाणाक्ष कर्णधार आहे. त्याचबरोबर आयपीएमध्ये खेळताना धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने तीनवेळा जेतेपदही पटकावलेले आहे. पण चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद हे सुरुवातीला धोनी देण्यात येणार नव्हते, तर संघ मालकांच्या डोक्यात एका दिग्गज खेळाडूचे नाव होते. हा दिग्गज खेळाडू होता तरी कोण, पाहा…

वाचा-IPL2020: आयपीएलमध्ये खेळणारा ‘हा’ ठरणार पहिला अमेरिकन क्रिकेटपटू

आयपीएलचा पहिला लिलव जेव्हा झाला तेव्हा चेन्नईच्या संघाची नजर या दिग्गज खेळाडूवर होती. पण एका संघाने आपला आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड केली. त्यामुळे या दिग्गज खेळाडूला चेन्नईला आपल्या संघात सहभागी करून घेता आले नाही. त्यामुळे त्यांनी धोनीचा पर्याय कर्णधारपदासाठी निवडला. पण धोनीला संघात घेण्यासाठीही चेन्नईचा वाट पाहावी लागली. कारण मुंबई इंडियन्सही धोनीला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक होता. पण काही वेळाने मुंबईने धोनीला संघात घेण्याचा विचार सोडून दिला आणि त्यानंतर चेन्नईने धोनीला आपल्या संघात सहभागी करून घेतले.

वाचा-IPL2020:महेंद्रसिंग धोनीचा नवा लुक, फोटो झाले व्हायरल

चेन्नई आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू एस. बद्रीनाथने याबाबतचा खुलासा केला आहे. एका युट्यूब चॅनेलवर त्याची मुलाखत सुरु होती. या मुलाखतीमध्ये बद्रीनाथने चेन्नईचे मालक एन. श्रीनिवासन यांना संघाच्या कर्णधारपदासाठी कोणता खेळाडू हवा होता, हे त्याने सांगितले आहे. बद्रीनाथ यावेळी म्हणाला की, ” एकदा श्रीनिवासन यांनी सांगितले होते की, संघाच्या कर्णधारपदासाठी त्यांना भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हवा होता. सेहवाग हा लिलावामध्ये सहभागी होता. पण दिल्ली कॅपिटल्स या संघाने सेहवागला आपला आयकॉन खेळाडू बनवला होता. त्यामुळे चेन्नईला सेहवागला आपल्या संघात सामील करून घेता आले नाही.”

वीरेंद्र सेहवाग

वाचा-सचिन तेंडुलकरचे नाव वापरून दबाव आणला जातो; धक्कादायक खुलासा

बद्रनाथ पुढे म्हणाला की, ” सेहवागला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात सहभागी केले होते. त्यानंतरही चेन्नई सुपर किंग्स संघाच्या संघ व्यवस्थापनाने सेहवागशी संपर्क साधला होता. पण तेव्हा आपण दिल्लीच्या संघातूनच खेळणार असल्याचे सेहवागने सांगितले होते. त्यावेळी सेहवाग चेन्नईच्या संघात येणार नाही, हे स्पष्ट झाले होते.”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *