Cricket: क्रिकेटपटूवर आली अशीही वेळ, चेंडू आणण्यासाठी थेट पार्किंगमध्येच गेला… – bizarre! australia’s mitchell marsh walks into parking area to fetch the ball – watch video


करोनामुळे क्रिकेटवर बरीच बंधन आलेली आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूंनाही काही समस्या जाणवत आहे. यापूर्वी चेंडू सीमारेषे पार गेला की तो सहज मिळायचा. पण आता चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे एका क्रिकेटपटूवर स्टेडियमच्या पार्किंगमध्ये जाऊन चेंडू आणण्याची वेळ आली. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर विजय मिळवला. पण या सामन्यात एका ऑस्ट्रेलियाच्याच खेळाडूवर गाड्यांच्या पार्किंगमध्ये जाऊन चेंडू आणण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. नेमके घडले तरी काय, पाहा…

ही गोष्ट सामन्याच्या २७ व्या षटकात घडली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा गोलंदाजी करत होता. त्याचा सामना करायला इंग्लंडचा सॅम बिलिंग्स सज्ज होता. कमिन्सने एक बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सॅमने या चेंडूनर जोरदार प्रहार करण्याता प्रयत्न केला, पण चेंडूने सॅमच्या बॅटची कडा घेतली. पण सॅमच्या ताकदिच्या जोरावर हा चेंडू सीमारेषेपार गेला आणि इंग्लंडला षटकार मिळाला. पण हा चेंडू त्यानंतर गाड्यांच्या पार्किंगच्या येथे गेला. आता स्टेडियममध्ये प्रेक्षक तर नव्हतेच. त्यामुळेच पार्किंगमध्ये जाऊन चेंडू आणण्याची वेळी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शवर आली होती.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडपुढे २९५ धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला सुरुवातीलाच चार धक्के दिले. यामधून सॅम बिलिंग्सने इंग्लंडच्या संघाला सावरले. सॅमने १०९ धावांची खेळी साकारली असली तरी त्याला संघाला विजय मात्र मिळवून देता आला नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जोश हेझलवूडची नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळाली. जोशने या सामन्यात १० षटकांमध्ये २६ धावा देत तीन बळी मिळवले होते. त्याचबरोबर तीन षटके निर्धावही टाकली होती.

चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २०१९ च्या लिलावात कोणताही संघ ज्याच्यावर बोली लावत नव्हता त्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला संघात घेतले होते. कोणीही बोली लावत नसताना धोनीने जोशला संघात घेतल्यावर सर्वांनाच धक्का बसला होता. जोशला दोन कोटींच्या बेसप्राइजवर चेन्नईने आपल्या संघात स्थान दिले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *