corona vaccine oxford: ​चांगली बातमी! करोनावरील ऑक्सफर्ड लसीची चाचणी पुन्हा सुरू, भारतात मंजुरीची प्रतीक्षा​ – corona vaccine oxford restart test astrazenecas serum institute of india


नवी दिल्लीः ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि astrazeneca कंपनी यांच्याकडून करोनावर तयार करण्यात येत असलेली AZ1222 या लसीची चाचणी भारतात पुन्हा सुरू केली जाऊ शकते. लसच्या निर्मिती अॅस्ट्राझेनेकाची भागीदार भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) याबद्दल माहिती दिलीय. ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (DGCI) मंजुरी देताच लसीची चाचणी पुन्हा सुरू केली जाईल, असं सीरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आलंय. एका व्यक्तीवर चाचणी दरम्यान परिणाम झाल्यानंतर AZ1222 ची चाचणी थांबवण्यात आली होती. पण आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

अदार पुनावाला यांनी व्यक्त केला आनंद

SII चे संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मालक अदार पुनावाला (SII CEO and Owner Adar Poonawalla) यांनी या वृत्ताबद्दल आनंद व्यक्त केला आहे. चाचण्यांदरम्यान अशा प्रकारचे अडथळे येत असतात, असं ते म्हणाले. ‘चाचण्या पूर्ण होण्यापूर्वीच आपण कुठलाही निष्कर्ष काढू नये. प्रक्रियेबद्दल कोणतीही धारणा न ठेवता शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण त्याचा आदर करावा. अलीकडील घडामोडी हे स्पष्ट होतं. आणि ही चांगली बातमी आहे’, असं पुनावाला यांनी ट्विट करून सांगितलं.

लडाख तणाव; भारत-चीन सैन्यात ४ तास चालली ब्रिगेड-कमांडर स्तरावरील बैठक

ब्रिटनमध्ये AZ1222 ची चाचणी पुन्हा सुरू

ब्रिटनचे ड्रग रेग्युलेटर एमएचआरएने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि astrazeneca ची करोना लस AZ1222 ची चाचणी पुन्हा सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी एका स्वयंसेवकार लसीचा विपरीत परिणाम दिसून आल्यानंतर लसीची चाचणी थांबवली गेली होती. वैद्यकीय माहिती उघड करू शकत नाहीत. पण स्वतंत्र तपासणीत ही चाचणी सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे, असं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी निवेदनात म्हटलं आहे.

सोनिया गांधी उपचारासाठी विदेशात रवाना, राहुल गांधीहीसोबत

समितीच्या तपासणीत चाचणी सुरक्षिक

जगभरात या लसीची चाचणी 6 सप्टेंबरपासून थांबवली गेली आणि मानक आढावा प्रक्रिया सुरू केली गेली. या संदर्भात नेमण्यात आलेल्या ब्रिटनमधील समितीने आपला तपास पूर्ण केली आणि एमएचआरएला ब्रिटनमध्ये लसच्या चाचण्या पुन्हा सुरू करण्यास सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलं आहे. चाचणीत सहभागी झालेल्या सर्व संशोधक आणि भागीदारांना संबंधित सूचनांची माहिती दिली जाईल. औषध निर्माती अॅस्ट्राझेनेकाने लस तयार करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला आहे. त्याअंतर्गत कोरोनावर लस तयार करण्याचे काम सुरू आहे. चाचणीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात सकारात्मक परिणाम आढळले आणि लसीमुळे रुग्णाच्या शरीरात अँन्टीबॉडी तयार झाल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *