amit shah: अमित शहांना श्वास घेण्यास त्रास, रात्री उशिरा एम्समध्ये दाखल – union home minister amit shah admitted aiims in delhi


नवी दिल्लीःकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत अमित शहा यांना पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचं आढळलं होतं. उपचारानंतर करोनामुक्त झाल्याने अमित शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता पुन्हा श्वास घेण्यात त्रास होत आल्यामुळे अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री ११ वाजता अमित शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.

चांगली बातमी! करोनावरील ऑक्सफर्ड लसीची चाचणी पुन्हा सुरू, भारतात मंजुरीची प्रतीक्षा

सोनिया गांधी उपचारासाठी विदेशात रवाना, राहुल गांधीहीसोबत

करोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमित शहा यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमित शहा यांनी काही काळ हॉस्पिटलमध्येत रहावं. तिथेच त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली चांगले उपचार होतील, असं एम्समधील एका सूत्राने सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *