ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया: करोना लस चाचणीसाठी ‘सिरम’ची उमेदवार भर्ती तूर्तास रोखली! – dcgi prohibits recruitment of new candidates for clinical trials in serum institute till further orders


नवी दिल्ली : ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया‘ अर्थात डीसीजीआय (DCGI) कडून लस तयार करणाऱ्या भारतीय सीरम संस्थेला (SII) निर्देश देण्यात आलेत. पुढच्या आदेशापर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लशीच्या चाचणीसाठी नव्या उमेदवारांची भर्ती रोखण्याचे निर्देश डीसीजीआयनं ‘सीरम’ला दिलेत. औषध कंपनी ‘एस्ट्राजेनेका’नं ( Astrazeneca) इतर देशांत ऑक्सफर्ड कोविड १९ च्या लशीची चाचणी थांबविल्यानंतर डीसीजीआयनं सीरमला ही सूचना केलीय.

महानियंत्रक डॉक्टर व्ही जी सोमानी यांनी शुक्रवारी एका आदेशाद्वारे ‘भारतीय सीरम संस्थे’ला आत्तापर्यंत चाचणी अवस्थेत असणारी करोना लस टोचून घेतलेल्या लोकांच्या सुरक्षेत वाढण्यात करण्यात यावी, त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवावी तसंच योजना आणि रिपोर्ट सादर करावेत, असे आदेश दिलेत. महानियंत्रकांच्या या आदेशाची प्रत पीटीआयला प्राप्त झालीय.

वाचा :ड्रग कंट्रोलरच्या नोटीसनंतर सीरम इन्स्टिट्यूटने देशात करोना लसीची चाचणी थांबवली
वाचा :चिंताजनक उच्चांक! २४ तासांत आढळले ९६,५५१ करोना रुग्ण

भविष्यात चाचणीसाठी नव्या भर्ती करण्यापूर्वी डीसीजीए कार्यालयाकडून पूर्व परवानगी घेण्यासाठी ब्रिटन आणि भारतात ‘डाटा अँड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड’ (DSMB) कडून मंजुरी जमा करावेत, असे आदेशही महानियंत्रकांनी सीरमला दिलेत.

करोनावरील लसीची चाचणी ब्रिटनमध्ये आणि इतर देशांमध्ये थांबवण्यात आल्यानंतर ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’नं बुधवारी (DCGI) सीरमला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली होती. सीरमनं या विषयीची माहिती का दिली नाही? अशी विचारणा करतानाच आपल्या चाचण्या का थांबवू नये, असा प्रश्नही DCGI सीरमला विचारला होता. त्यानंतर तत्काळ चाचण्या थांबवण्याचा निर्णय सीरमने घेतला होता. ‘आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (DCGI) सूचनांचे पालन करत, ‘एस्ट्राजेनेका’कडून पुन्हा चाचण्या सुरू होईपर्यंत आम्ही भारतात होत असलेल्या चाचण्या थांबवत आहोत. चाचण्यांसंदर्भात यापुढे कुठलीही टिप्पणी केली जाणार नाही. पुढील माहिती आपण ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाशी संपर्क करावा’, असं निवेदन ‘सीरम’कडून जारी करण्यात आलं होतं.

वाचा :शनिवारपासून सुरू होतायत ८० विशेष ट्रेन; प्रवासापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी!
वाचा :रुग्णवाहिकांनी करोनारुग्णांकडून उचित भाडे आकारावे; सुप्रीम कोर्टाचे निर्देशSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *