work from home new normal: ‘न्यू नॉर्मल’; या कंपन्यांचा तीन वर्षांसाठी घरून काम करण्याचा पर्याय – corporate may extend work from home for three years


ईटी वृत्त, नवी दिल्ली : देशातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता ‘वर्क फ्रॉम होम’चाच (डब्लूएफएच) पर्याय कंपन्या दीर्घ काळासाठी स्वीकारू शकतात, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. ‘केपीएमजी रिसर्च’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ३३ टक्के कंपन्या आगामी तीन वर्षांसाठी घरून काम करण्याचा पर्याय स्वीकारू शकतात, तर आणखी दहा टक्के कंपन्यांना दीर्घ काळासाठी कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागेल, असे वाटत असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

कमॉडिटी बाजारात नफावसुली ; सोने-चांदीचे भाव गडगडले
देशातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि त्याचा संसर्ग होण्याच्या शक्यतेमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली. सुरुवातीला ही परवानगी तात्पुरत्या काळासाठी असेल, असे कंपन्यांना वाटत होते. मात्र, हे धोरण कदाचित दीर्घ काळासाठी ठेवावे लागेल, अशी स्थिती असल्याचा हा अभ्यास सांगतो. मुंबईतील करोनाग्रस्तांची मोठी संख्या पाहता ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ने (एचयूएल) कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी वाढवली आहे.

मुकेश अंबानींना मिळणार २० अब्ज डॉलर; पाहा कोण आणि कशासाठी देणार इतकी रक्कम!
कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास कुठल्याही प्रकारचा धोका नसेल, तेव्हाच त्यांना बोलावणे उपयुक्त ठरेल, असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, कंपनी पुन्हा सुरू होताना कर्मचाऱ्यांचे मतही जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘सिप्ला’ कंपनीनेही कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर २०२०पर्यंत घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.

वाचा : शेअर बाजार ; सेन्सेक्स आणि निफ्टीत झाली घसरण
काय आहे स्थिती?

– करोनाचा धोका संपला नसल्याने कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्यास कंपन्यांचे प्राधान्य

– एचयूएल, डेलॉइट, सिप्ला या कंपन्यांचे कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याचे धोरण

– त्यासंबंधीच्या नियमावली काही कंपन्यांकडून प्रसिद्ध

– टायटन, सॅमसंग कंपन्यांमध्ये २५ ते ३० टक्के कर्मचारी कार्यालयांमध्ये कामावर

– सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात वाटणारा हा उपाय आता दीर्घ काळासाठी असू शकतो, असे या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मतSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *