Uttar Pradesh: प्रेयसी-प्रियकराला खांबाला बांधून बेदम मारहाण; मुलाचे कपडे फाडले, व्हिडिओ व्हायरल – uttar pradesh girlfriend boyfriend beaten up by mob in maharajganj


महाराजगंज: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. जमावाने एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाला खांबाला बांधून बेदम मारहाण केली. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या एकाच प्रकरणात तीन गुन्हे दाखल केले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ जवळपास दीड मिनिटाचा आहे. गावातील काही लोकांनी प्रेमीयुगुलाला झाडाला बांधले आणि त्यांना मारहाण केली जात असल्याचे या व्हिडिओत दिसते. काही गावकऱ्यांनी मुलाचे कपडे फाडले असून, त्याला बेदम चोप दिला जात आहे. तर मारहाण करतानाच शिवीगाळही केली जात आहे. घुघली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.

गर्लफ्रेंडला भेटायला घरी गेला, तरुणाला बांधून उकळतं पाणी अंगावर ओतलं

पती-पत्नी म्हणून ८ वर्षे संसार केला; मृत्यूनंतर ‘ते’ रहस्य उलगडलं, सगळ्यांना बसला धक्का

घटनेची माहिती होताच पोलिसांनी या प्रकरणात तीन गुन्हे दाखल केले आहेत. एक तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाविरोधात दाखल केली आहे. तर मारहाण करणाऱ्या जमावाविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या लोकांविरोधातही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. प्रेमीयुगुलाला जमावाकडून बेदम मारहाण केली जात असल्याचे त्यात दिसते. पोलिसांनी दखल घेऊन मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत.

पत्नीला बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले; पतीने चपलेने थोबडवले, व्हिडिओ व्हायरल

प्रियकराच्या हातात हात घालून फिरत होती पत्नी, व्यापाऱ्याने भररस्त्यात चोपले

मैत्रीनं केला घात! गळ्यातील सोन्याच्या चेनसाठी मित्रांनीच केली तरुणाची हत्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *