Suicide in Jalgaon Covid Hospital: जळगावात खळबळ! करोना संशयिताने रुग्णालयातच घेतला गळफास – covid suspected patient hangs self in jalgaon district hospital


म. टा. प्रतिनिधी । जळगाव

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात जिल्हा कोविड रुग्णालयात एका करोना संशयित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोविड रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक सहा मध्ये गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता समोर आली आहे. कडुबा नकुल घोंगडे (वय ५० रा. पहूर ता. जामनेर) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे

कडुबा घोंगडे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांची करोनासाठी अँटीजन चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तरी देखील त्रास कमी होत नसल्याने त्यांना करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी जळगाव येथे कोविड रुग्णालयात हलविण्यात आले होते. ९ सप्टेंबर रोजी त्यांना पहुरच्या ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक सहा मध्ये उपचार सुरू होते. काल गुरुवारी दि.१० सप्टेंबर रोजी त्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्त्राव घेण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल अद्याप रुग्णालय प्रशासनाला मिळालेला नाही. तत्पूर्वीच त्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कडुबा यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जेवण घेतले नव्हते. वॉर्डमधील नर्स त्यांना जेवण आणि औषधे घेण्यासाठी विनंती करत होते. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. वेळ झाल्याने नर्सने त्यांना झोपण्याची विनंती केली. नंतर नर्स त्यांच्या खोलीत गेल्या. पुन्हा रात्री साडेबारा वाजता नर्स राऊंडला आल्या असता कडुबा बेडवर नव्हते. म्हणून त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. तरीही रुग्ण सापडत नसल्याने नर्सने डॉक्टरांना माहिती दिली. तेव्हा सर्वांनी धाव घेऊन पाहणी केली असता, वॉर्ड क्रमांक सहाच्या बाजूच्या खोलीत कडुबा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले, अशी माहीती जिल्हा कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. या घटनेनंतर आम्ही पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्याचेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *