Rohit Pawar Says I Have Full Faith In Mahavikas Aghadi Government – मराठा आरक्षण: रोहित पवार म्हणतात, महाआघाडी सरकारवर पूर्ण विश्वास


अहमदनगर: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली असताना सत्ताधारी पक्षाकडून सरकारची बाजू हिरीरीनं मांडली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याबद्दल बोलताना महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.

वाचा: मुंबईचे ‘बिर्याणी किंग’ जफरभाई मन्सुरी यांचा करोनाने मृत्यू

रोहित पवार यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं १०% आरक्षण ही दोन्ही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडं सोपवली. मात्र, तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
वाचा: वुई वॉण्ट मुंढे साहेब… तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर

‘सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मी पाहतोय. आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी घटनापीठाकडं पाठवण्याची मागणीही आपणच केली होती. लाखो युवांच्या भावनेचा व भविष्याचा हा प्रश्न असून अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. यात कुणीही राजकारण करु नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *