Rhea Chakraborty Bail Court Verdict Ncb – रिया चक्रवर्तीला मिळू शकतो का जामीन, आज होईल मुंबई कोर्टाचा निर्णय


मुंबई- सुशांतसिंह प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती हिला, ड्रग्ज प्रकरणात २२ सप्टेंबरपर्यंत मुंबईच्या भायखळा तुरूंगात ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जामिनासाठी रियाने मुंबईच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर आज निर्णय होणं अपेक्षित आहे. सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणात अटक झालेली रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली होती.

आज या याचिकेवर निर्णय येणं अपेक्षित आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी रियाला अटक केली आणि त्याच दिवशी न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. यापूर्वी मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने रियाला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर रियाने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला. ज्याचा निर्णय आज होणार आहे.

विशेष न्यायाधीश जी.बी. गुरव यांनी गुरुवारी चक्रवर्ती भावंडं व विशेष सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकला. न्यायाधीशांनी या प्रकरणातील अन्य चार आरोपींच्या जामीन याचिकांवर सुनावणी केली. त्यानंतर न्यायालयाने खटला शुक्रवारपर्यंत तहकूब केला. शुक्रवारी सर्व जामीन याचिकांवर निर्णय होणं अपेक्षित आहे. ही याचिका रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दाखल केली.

२८ वर्षीय अभिनेत्री निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात रियासह अटक केलेल्या सर्व आरोपींच्या (ड्रग स्मगलर अनुज केशवानी वगळता) जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या रियाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तीन दिवसांच्या चौकशीनंतर मंगळवारी अटक केली. शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना गेल्या आठवड्यात एनसीबीने अटक केली होती.

रियाच्या याचिकेत नक्की काय- काय गोष्टी आहेत

रियाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, तिच्या चौकशी दरम्यात एकही महिला पोलीस अधिकारी नव्हती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार महिलेचे चौकशी ही पक्त महिला अधिकारी किंवा महिला कॉन्स्टेबल असतानाच केली गेली पाहिजे. मात्र रियाच्या बाबतीत असं काही झालं नाही. तसेच जामीन अर्जात रियाने स्पष्ट सांगितलं की, ती निर्दोष असून तिला या प्रकरणात जाणीवपूर्वक गुंतविण्यात आलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *