Rahul Gandhi: Rahul Gandhi: जवान आणि अधिकाऱ्यांचे भोजन वेगळे का?; राहुल गांधींचा सवाल – why there is difference between the meals of the soldiers and the officers asks rahul gandhi in parliamentary standing committee meeting


नवी दिल्ली: लडाख सीमेवर भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या (India-China Clash) पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीची (Parliamentary Standing Committee On Defence) बैठक पार पडली. या बैठकीत जनरल बिपिन रावत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि कांग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उपस्थित होते. लष्कराचे सैनिक (soldiers) आणि सशस्त्र दलाचे अधिकारी (officers) यांचे भोजन वेगवेगळे का आहे?, असा प्रश्न या बैठकीत राहुल गांधी यांनी विचारल्याचे स्थायी समितीतील सूत्रांनी दिली.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातून आलेल्या जवानांची भोजनाच्या सवयी आणि स्वाद अधिकाऱ्यांच्या तुलनेत वेगळ्या असतात. बहुतेक अधिकारी हे शहरी भागातून आलेले असतात. असे असले तरी जवान आणि अधिकाऱ्यांना वाढण्यात येणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेत कोणताही फरक नाही, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आज पार पडलेल्या बैठकीतील विषय संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींकडून माहिती घेणे, विशेषत: सीमावर्ती क्षेत्रात संरक्षण दलांसाठी रेशन आणि आवश्यक वस्तूंच्या गुणवत्ता राखणे असे होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सद्य स्थितीवर एका प्रेझेंटेशनची मागणी केली अशी माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार यांच्या मागणीची दखल घेतली गेली असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या पूर्वी राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्विट केले. चीनने आमच्या जमीनीवर कब्जा केला आहे. भारत सरकार ही जमीन परत मिळवण्याची योजना बनवत आहे का? किंवा मग ही एक दैवी घटना असल्याचे सांगून हे प्रकरण सोडून देऊ इच्छिते, असे प्रश्न राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटद्वारे उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी या पूर्वी अनेकदा चीनी घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- उद्यापासून सुरू होतायत ८० विशेष ट्रेन; प्रवासापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्याव्यतिरिक्त करोना (Coronavirus), रोजगार, खासगीकरण, परीक्षा, जीडीपीतील घसरण आणि अर्थव्यवस्थेवर सतत मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. काँग्रेस पक्ष येत्या पावसाळी अधिवेशनात चीनी घुसखोरीच्या मुद्द्यावर आक्रमकपणे मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘मोदी सरकारने आपली १००० वर्ग किमी जमीन चीनला सोडली की काय?’

क्लिक करा आणि वाचा- रुग्णवाहिकांनी करोनारुग्णांकडून उचित भाडे आकारावे; सुप्रीम कोर्टाचे निर्देश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *