petrol diesel price unchanged: इंधन दर ; पेट्रोलियम कंपन्यांच्या ‘या’ निर्णयाने दिलासा – petrol and diesel price unchanged today


मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी ग्राहकांना दिलासा दिला. कंपन्यांनी आज इंधन दरात कोणताही बदल केला (petrol diesel price unchanged today) नाही. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.६४ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लीटर ७९.५७ रुपयांवर कायम आहे. गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली होती.

सराफा ; जाणून घ्या आज किती रुपयांनी स्वस्त झाले सोने
कंपन्यांनी मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. तर गुरुवारी पेट्रोल ९ पैसे तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त केले होते. आज इंधन दर जैसे थे ठेवल्याने दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.९९ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.०५ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा आजचा भाव ८४.९६ रुपये असून डिझेल ७८.३८ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.४९ रुपये आहे. डिझेल ७६.५५ रुपये प्रती लीटर आहे.

अंबानींची कमाल ;’रिलायन्स’चे बाजार भांडवल ऐकून व्हाल थक्क!
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित केला जातो. मागील दोन महिने कधी पेट्रोल तर कधी डिझेल दरात कपात केली जात होती. देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते.

करोनाचा फटका ;पर्यटन उद्योगाचे पाच लाख कोटींचे नुकसान
डब्ल्यूटीआय कच्च्या तेलात बुधवारी ३.५ टक्क्यांची वाढ झाली व ते दर ३८.१ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. आधीच्या व्यापारी सत्रात झालेले मोठे नुकसान भरून काढत बाजाराने कच्च्या तेलाच्या जास्त विक्रीचे विश्लेषण केले. तथापि, घटलेल्या मागणीचा विचार करत ऑगस्ट २०२० महिन्यात कच्च्या तेलाचा मोठा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने आशियाई देशातील अधिकृत विक्री किंमत (ओएसपी) कमी केल्याने तेलाच्या किंमतीवर दबाव कायम राहिला. तेल बाजाराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ओपेक आणि सदस्य संघटनांची बैठक येत्या १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ओपेक+ ने वाढती मागणी लक्षात घेता, ऑगस्ट महिन्यापासून उत्पादनात दररोज ७.७ बॅरलपर्यंत कपात केली. जागतिक स्तरावरील आर्थिक घसरणीतून सावरण्यासाठी तेल बाजार संघर्ष करत आहे. मात्र साथीच्या आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे तेलाच्या बाजारपेठेबाबतचा दृष्टीकोन प्रभावित झाला. आर्थिक सुधारणांबाबत अनिश्चितता असल्याने जगातील तेलाच्या पुरवठ्यात वाढ होत आहे. मात्र वापर कमी होत आहे. त्यामुळे कच्च्या तेलावर दबाव कायम आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *