Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा नवा लूक आला समोर, फोटो झाले व्हायरल – mumbai indians players krunal pandya’s new look became viral


गेल्यावर्षी जेतेपद पटकावलेला मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला जोरदार सराव करत आहे. या हंगामातही जेतेपद पटकावण्याचा त्यांचा मानस आहे. पण या नव्या हंगामालाठी मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने एक खास लूक तयार केला आहे. या लूकचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने चांगलीच कंबर कसलेली आहे. मुंबईचा संघ रोज कसून सराव करताना पाहायला मिळाला आहे. या सरावादरम्यान मुंबईच्या खेळाडूचा एक खास लूक सर्वांना पाहायला मिळाला आहे. या नव्या लूकचे फोटो या खेळाडूनेच सोशल मीडियावर पोस्ट केलेले पाहायला मिळत आहेत.

वाचा-आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने रचला ‘हा’ विक्रम

मुंबई इंडियन्सचा संघ सराव करताना सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याने. कृणालने या हंगामात आपला नवा लूक तयार केला आहे. सराव करताना कृणाल आपल्या डोक्याला नवनवीन बँड लावत असल्याचे पाहायला मिळाले आहे. या रंगबेरंगी बँडने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कृणालने आपले हे विविध फोटो आपल्या इंटाग्रामवर पोस्ट केले असून ते चांगलेच व्हायरल झालेले आहेत.


मुंबई इंडियन्सचे या आपीएलमध्ये असतील असे सामने…
19 सप्टेंबर – शनिवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
23 सप्टेंबर, बुधवार – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 सप्टेंबर, सोमवार – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 ऑक्टोबर, गुरुवार – किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
4 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजा
6 ऑक्टोबर, मंगळवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
11 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
18 ऑक्टोबर, रविवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा
25 ऑक्टोबर, रविवार – राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
28 ऑक्टोबर, बुधवार – मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी
31 ऑक्टोबर, शनिवार – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजा

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *